राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात:ठाण्यातील डोंबिवलीतून फोडणार प्रचाराचा नारळ

राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात:ठाण्यातील डोंबिवलीतून फोडणार प्रचाराचा नारळ

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून निवडणूक रिंगणात कोणकोणते उमेदवार असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. ते डोंबिवलीत डोंबिवली पहिली सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा न देता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीर सभा सोमवार 4 नोव्हेंबर रोजी डोंबिवली घेणार आहेत. ही जाहीर सभा कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीता चेंदवणकर यांच्यासाठी असणार आहे. श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी चार वाजता ही सभा होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली दुसरी जाहीर सभा मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात घेतील. संदीप पाचंगे, कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सुर्यराव आणि मिराभाईंदर उमेदवार संदीप राणे यांच्यासाठी असून सायंकाळी सहा वाजता ब्रम्हांड सर्कल, आझादनगर येथे होणार आहे. ठाणे जिल्ह्यात 78 उमेदवारी अर्ज बाद
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असतानाच राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 47 इच्छुकांचे 78 उमेदवारी अर्ज छानणी प्रक्रियेत बाद झाले आहेत. 334 उमेदवारांचे 417 अर्ज वैध ठरले आहेत. हे ही वाचा… राज ठाकरेंनी परस्परच उमेदवार दिला:माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार, माघार नाही, निवडणूक लढणारच- एकनाथ शिंदे माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहीममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांतकडे देखील आम्हाला लक्ष द्यावे लागेल. कार्यकर्त्यांचे मनोबल खचून जाता कामा नये, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरेंना मदत करणार नाही असे स्पष्ट केले आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment