राज्यात प्रथमच युती सरकारमुळे महिला मतपेढी तयार:विरोधक सत्तेत होते तेव्हा महिलांना दुर्लक्षित केले, डॉ. नीलम गोर्‍हेंची टीका

राज्यात प्रथमच युती सरकारमुळे महिला मतपेढी तयार:विरोधक सत्तेत होते तेव्हा महिलांना दुर्लक्षित केले, डॉ. नीलम गोर्‍हेंची टीका

विरोधक सत्तेत होते तेव्हा महिलांना दुर्लक्षित केले जात होते. मात्र 2014 पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्‍न समजून घेतले. महिलांच्या प्रश्‍नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात प्रथमच महिलांची मतपेढी तयार झाली आहे. अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, महिला बचत गट, शहरांकडे होणारे स्थलांतर, रोजगार हमी, शिक्षणाचे वाढते प्रमाण तसेच महिलांचा सन्मान वाढविणार्‍या विविध योजनांमुळे महिलांना महिलांचा हक्क मिळत आहे. त्यांनाही त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली आहे. त्यामुळेच यावेळी महिलांची पतपेढी तयार झाली असल्याचेही डॉ. गोर्‍हे यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. युतीच्या काळात या घटनेत मोठी घट झाली आहे. तसेच अनेक पिढीत महिलेला न्याय देण्याचे काम युती सरकारने केले आहे. लाडकी बहिण योजनामुळे वातावरण बदलले आहे. ही योजना निवडणुक चेंजर ठरणार आहे. एकमेकांविषयी बोलताना कोणी अपशब्द वापरल्यास त्यावर निवडणुक आयोग त्याची दखल घेत आहे. ही चांगली गोष्ट आहे. खरे तर कोणाविषयी बोलताना आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाहीत, याची प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. चौथे महिला धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणूकीत महिला उमेदवारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचेही डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment