नि:शुल्क मूत्ररोग निदान तपासणी शिबिराला प्रतिसाद:डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये आयोजन; रुग्णांची केली युरोफ्लोमेट्री चाचणी

प्रतिनिधी | अमरावती दैनंदिन जीवनात मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होणे महत्त्वाचे असते. नॉर्मल जीवन जगण्याचे ते मापक आहे. मूत्र रोगाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी रविवारी (दि. १६) डॉ. हेडगेवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये युरोफ्लोमेट्री चाचणी व मूत्ररोग निदान नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. ५६ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात डॉ. प्रतिक चिरडे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी केले. या प्रसंगी संस्था सचिव महेश जोग, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक डॉ. यशोधन बोधनकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश इंगोले, डॉ. प्रतिक चिरडे उपस्थित होते. त्यांचे स्वागत संस्थाध्यक्ष अजय श्रॉफ यांनी केले आहे. या शिबिरासाठी डॉ. चिरडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे डॉ. विवेक अलटकर, डॉ. प्राजक्ता सुने ,डॉ. प्रणिकेत धारणे, संकेत सहारे, कोमल लेंडे, निकिता हिंगे, कुसुम बागडे, मयुरी चौधरी, सोनाली पेंढारकर, ज्ञानेश्वरी जुमळे, देवेंद्र लांजेवार, विकी भुरभुरे, अमर सांभारे, दीक्षा गायकवाड, ज्योती गासे, पुष्पा चचाणे, ज्योती चंद्रे, ज्योत्स्ना तोंडे, नंदा वानखडे, शालिनी हरणे, रोहिणी तुमसरे, प्रिन्सी काळे, श्रीकांत कांबळे, सौरभ लांडगे, दिलीप वानखडे, गौतम गाजरे, प्रमोद सोनकुसरे यांनी परिश्रम घेतले. शिबिराचे सूत्रसंचालन करून आभार अनिता कुळकर्णी यांनी मानले. या शिबिराचा अनेक गरजवंतांना लाभ घेतला आहे. शिबिराप्रसंगी रुग्णांची तपासणी करताना तज्ज्ञ. शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज : डॉ. काळे सध्याच्या काळात रुग्णसंख्या वाढत आहे. अशा वेळी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने मूत्ररोग निदान आणि युरोफ्लोमेट्री चाचणीचे नि:शुल्क शिबिर आयोजित करून समाजोपयोगी कार्याला हातभार लावला आहे. असे शिबिर सातत्याने आयोजित होणे काळाची गरज असल्याचे मत डॉ. विशाल काळे यांनी व्यक्त केले.