मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा!:सयाजी शिंदेची 50 वर्षांनी दोस्तासोबत भेट, सिनेमाच्या शुटींगसाठी कलकत्त्याला नेलं थेट, वाचा, जीवाहूनही प्यारा यारा

मित्र वैशाख वणव्यामध्ये गारव्यासारखे असतात. मग ती कितीही छोटी व्यक्ती असो, की कितीही मोठी. अभिनेता सयाजी शिंदे सारखीही. होय, मित्र कोणाच्याही काळजा जवळचाच असतो. सयाजी शिंदे यांना त्यांचे असेच दोन जिगरी यार भेटले. त्या भेटीचा आनंद त्यांना किती झाला म्हणून सांगायचा. त्यातला एक जण, तर तब्बल ५० वर्षांनी भेटलेला. या भेटीनंतर आपल्या एका मित्राला सयाजी शिंदेंनी सिनेमाच्या शुटींगसाठी चक्क कलकत्त्याला नेलं. वाचा तुमच्या-आमच्या साऱ्यांच्या हृदयाजवळची ही आगळीवेगळी बातमी. सयाजी शिंदेंच्या दोस्ताचं झालं असं, त्यांच्या एका सिनेमाचं शुटींग कलकत्त्याला होतं. त्यासाठी त्यांनी एका मित्राला सोबत ये म्हणून फोन केला. तो मित्र तर आला. त्याच्यासोबत आणखी एक मित्र आला. त्यांचा हा पूर्ण संवाद सध्या चर्चेत आहे. हा संवाद आणि या गाठीभेटीचा व्हिडिओ सद्धा प्रचंड व्हायरल होतोय. सयाजी शिंदे मित्राला फोन करतात आणि त्यांचे बोलणे सुरू होते. हा रंगलेला संवाद असा… सयाजी शिंदेः मला कलकत्त्याला शुटींगला जायचंय. एका पंजाबी फिल्मच्या. मित्रः कवा सयाजी शिंदेः आज दुपारी जायचंय. पुण्यावरून तिकडं. येतोयस कलकत्त्याला. मित्रः किती दिवस लागत्यात. सयाजी शिंदेः तीन दिवस तिकडं रहायचंय. आजचा चौथा दिवस. दोन चार दिवसांनी यायचं परत. इथून पुण्याला. पुण्याहून कलकत्ता. कलकत्त्यावरून शांतिनेकतन म्हणून आहे. तिकडं जाऊन…पंजाबी फिल्मच शुटींग आहे. चल मला जरा अभिनय शिकवायला तिकडं. (दोघंही नंतर खळखळून हसतात.) सयाजी शिंदेः मग सुनेला सांग. माझ्या मोबाइलवरती आधारकार्डचा फोटो पाठव. तू येणार का नाही अर्ध्या तासात मला कन्फर्म सांग. केदारला विचार. बैलं सांभाळशील का, खायला प्यायला घालशील का. आणि याच्याप्रमाणं सगळं ठरवू आपण. मित्रः बर…बर… (संवाद संपतो. गाडी येते. गाडीतून सयाजी शिंदे उतरतात. दोन मित्रांशी भेट होते. पुन्हा संवाद रंगतो.) सयाजी शिंदेः इतक्या दिवसांनी भेटलो. किती वर्ष झाले रे… मित्रः सातवीला… सयाजी शिंदेः पंचाहत्तर…पंचवीस…पन्नास वर्ष झाली… मित्रः पन्नास वर्ष झाली सयाजी शिंदेः काय करतोयस तू आता… दुसरा मित्रः काही नाही सयाजी शिंदेः आम्ही आता चाललोय पहिल्यांदा.. विमानानं चाललोय. काल म्हणला मला आठ वाजता येतो…आणि गेला रानात…सांगायचं ना येणार नाही म्हणून…. दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा धडाकेबाज सिनेमामध्ये ही दोस्ती तुटायची नाय, हे गाणं होतं. प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं. 1990 मध्ये आलेला हा चित्रपटही सुपरडुपर हिट झाला आणि हे गाणंही. कवी अनंत राऊत यांची एक प्रसिद्ध कविताय. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्यातल्या काही ओळी हृद्याला खूपच स्पर्शून जातात. त्या अशा… दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… | वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी,
एक तू मित्र कर, आरशासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर, मनासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || फेक तू मुखवटे, भेट झाल्यावरी,
भेट रे दोस्ता, दोस्तासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || चालताना मध्ये, रात आली कधी,
मित्र येतो पुढे, काजव्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || मैतरी चाटते, गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला, वासरासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || त्रासलो जिंदगी, चाळताना पुन्हा,
बस धडा “मैतरी” वाचण्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || का उगा हिंडतो, देव शोधायला,
मित्र आहे जवळ, मंदिरासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || दृष्ट लागू नये, वेदनेची पुन्हा,
दृष्ट लागू नये, वेदनेची मना,
मित्र डोळ्यामध्ये, काजळासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… || जाळताना मला, देह ठेवा असा,
हात खांद्यावरी, टाकल्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा…|| दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा ,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||