आदिवासी आमदारांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या:नरहरी झिरवळ, हिरामण खोसकरांना संरक्षक जाळीवरून काढले, ‘पेसा’ भरतीसाठी आक्रमक

आदिवासी आमदारांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या:नरहरी झिरवळ, हिरामण खोसकरांना संरक्षक जाळीवरून काढले, ‘पेसा’ भरतीसाठी आक्रमक

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी शुक्रवारी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. पण हे दोघेही मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर पडल्याने बचावले. या आमदारांच्या आंदोलनामुळे काहीवेळ अवघे मंत्रालयच स्तब्ध झाले होते. धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अनुसूचित जमाती अर्थात एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याला आमदार नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर, किरण लहामटे, काशीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. या प्रकरणी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण ही भेट निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. झिरवळांच्या मानेला दुखापत नरहरी झिरवळ यांच्यासह हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकारामुळे मंत्रालयात एकच हल्लकल्लोळ माजला. त्यानंतर पोलिसांनी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांना जाळीवरून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत झिरवळ यांच्या मानेला दुखापत झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे झिरवळ यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक मंत्रालयात पोहोचले आहे. प्लॅन बी तयार असल्याचा दिला होता इशारा उल्लेखनीय बाब म्हणजे नरहरी झिरवळ यांनी काही वेळापूर्वी बोलताना मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचे ऐकावेच लागेल. ते आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. एसटी आरक्षणास धक्का लागू नये ही आमची मूळ मागणी आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपला रोष प्रकट केला. सरकारने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आली. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असेही ते यावेळी सरकारवर आगपाखड करताना म्हणाले. आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी नरहरी झिरवळ गत काही दिवसांपासून आदिवासी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. त्यांनी या प्रकरणी दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी आमदार, खासदारांचा ठिय्या आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असा आरोप किरण लहामटे यांनी केला आहे. विरोधी पक्षांची सरकारवर टीकेची झोड
दुसरीकडे, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल हे आता स्पष्ट आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणि सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला ज्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा दिला, आज त्यांच्यासाठी दोघांकडे वेळ नाही.
वेळ आहे तो फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंग,कंत्राटदार आणि घोटाळेबाजांसाठी, असे विधानसभेतील विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी म्हटले आहे.

​धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी शुक्रवारी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. पण हे दोघेही मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर पडल्याने बचावले. या आमदारांच्या आंदोलनामुळे काहीवेळ अवघे मंत्रालयच स्तब्ध झाले होते. धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अनुसूचित जमाती अर्थात एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याला आमदार नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर, किरण लहामटे, काशीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. या प्रकरणी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण ही भेट निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. झिरवळांच्या मानेला दुखापत नरहरी झिरवळ यांच्यासह हिरामण खोसकर यांनीही उडी मारली. त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकारामुळे मंत्रालयात एकच हल्लकल्लोळ माजला. त्यानंतर पोलिसांनी झिरवळ व त्यांच्या सहकाऱ्यांना जाळीवरून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत झिरवळ यांच्या मानेला दुखापत झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे झिरवळ यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक मंत्रालयात पोहोचले आहे. प्लॅन बी तयार असल्याचा दिला होता इशारा उल्लेखनीय बाब म्हणजे नरहरी झिरवळ यांनी काही वेळापूर्वी बोलताना मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचे ऐकावेच लागेल. ते आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. एसटी आरक्षणास धक्का लागू नये ही आमची मूळ मागणी आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपला रोष प्रकट केला. सरकारने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आली. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असेही ते यावेळी सरकारवर आगपाखड करताना म्हणाले. आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी नरहरी झिरवळ गत काही दिवसांपासून आदिवासी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. त्यांनी या प्रकरणी दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी आमदार, खासदारांचा ठिय्या आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असा आरोप किरण लहामटे यांनी केला आहे. विरोधी पक्षांची सरकारवर टीकेची झोड
दुसरीकडे, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल हे आता स्पष्ट आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणि सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला ज्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा दिला, आज त्यांच्यासाठी दोघांकडे वेळ नाही.
वेळ आहे तो फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंग,कंत्राटदार आणि घोटाळेबाजांसाठी, असे विधानसभेतील विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी म्हटले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment