गंगेत डुबकी मारली तरी गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही- ठाकरे:त्यांनी आम्हाला रामाचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही, DCM शिंदेंवर टीका

मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘मराठी भाषा दिवस’ या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्यावर तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. आता उद्या पेपरमध्ये येणार हिंदुत्व सोडले. हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाही. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक घोषवाक्य दिले होते गर्व से कहो हम हिंदू हे. आता अभिमानाने म्हणा आम्ही मराठी आहोत. शिवसेनेने महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी कार्य केले. मी म्हणेल की आपण स्वच्छ मराठी भाषेत आपण व्हॉट्सअपवर बोलले पाहिजे. पंतप्रधान मोदींना टोला लगावला हा मराठी दिवस साजरा करताना आपण उत्सवासारखा साजरा केला पाहिजे. गद्दारी करून आपले सरकार पाडल्यानंतर आम्हाला मराठी नाही येत असे आपल्या घरात ऐकायला मिळाले. मराठी साहित्य संमेलन झाले ते खरेच साहित्य संमेलन होते की आणखी काही माहीत नाही. भवाळकर यांनी जे भाषण केले ते दिशा देणारे भाषण होते. त्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर विचार व्हायला पाहिजे. मी जैविक नाही असे म्हणणाऱ्यावर खरेच किती विश्वास ठेवायचा यावर चर्चा व्हायला पाहिजे, देशभर चर्चा व्हायला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. मंगळावर यान उतरत असताना माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधतात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भावाळकर यांनी जे विचार मांडले ते खरेच विचार करण्यासारखे आहेत. माझ्या आजोबा प्रबोधन देत होते त्यामुळे त्यांना प्रबोधनकार म्हणतात. त्यांचे विचार आणि हे विचार मिळतेजुळते आहेत. अगदी कुंकुवारून त्या ज्या काही बोलल्या तसेच मी जे म्हणतो की नेमके कुठे जायचे तेच आपल्याला कळत नाही. एका बाजूला आपण फटाके वाजवतो, का तर आपले यान मंगळावर गेले. मंगळावर यान उतरत असताना माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो. नेमके जायचे कुठे आहे आपल्याला. केवळ धार्मिक कर्मकांड करणे म्हणजे संस्कार नाही, तर चांगले काम करणे म्हणजे संस्कार आहेत. नवीन हिंदुत्ववाल्यांनी आपल्याला राम नावाचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही एकनाथ शिंदे यांच्या प्रयागराज यात्रेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण अभिमान आहे गंगेचा पण इकडे पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे गंगेत डुबकी मारून यायचे, उपयोग काय त्याचा. महाराष्ट्राशी गद्दारी करून तिकडे डुबकी मारली तरी गद्दारीचा डाग पुसला नाही जाणार. जगाला चांगले शिकवणारी आपली आई मराठी भाषा आहे, म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. आपण गावात वगैरे रामराम म्हणतो पण आता रामराम म्हणणारे आपण जय श्री राम कधी म्हणायला लागलो हे सुद्धा कळले नाही. कोणी म्हणायला लावले आपल्याला जय श्री राम? हे नवीन हिंदुत्ववाल्यांनी आपल्याला राम नावाचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही. जय जय रघुवीर समर्थ म्हणणरे रामदास स्वामी यांनी आधीच शिकवले आहे आपल्याला. नीलम गोऱ्हे यांच्यावर टिका उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी जैविक नाही हे वाक्य कोणाच्या तरी अंगलट आले म्हणून फाटे फोडण्यासाठी म्हणून ही मुलाखत घेतली गेली की काय? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मुलाखतीवर टीका केली आहे. हा प्रश्न नव्हे तर हा माझा समज आहे. जे आपले राज्य गीत आहे ते कोणीतरी शमीमा अख्तर या मुसलमान मुलीने पहाडी आवाजात राज्यगीत गायले, यावर आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे काय बोलणार होते? ज्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी संबंध नाही अशा लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. त्या लढ्यात माझे आजोबा सेनापती सारखे समोर होते. खिडकीत बसून बघत बसले नव्हते. मोठी मोठी माणसे माझ्या आजोबांना भेटायला यायचे. आता मोठी माणसेच उरली नाहीत. शाहीर शाहीर अमर शेख हे देखील माझ्या आजोबांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत संसदेच्या बाहेर आंदोलन केले होते मराठी माणसासाठी. दिल्ली दणाणून सोडली होती त्यांनी. ते गीत गायचे जागा मराठा आम जमाना बदलेगा आणि मराठी माणसाने जमाना बदलून दाखवला होता. पुढे ते म्हणायचे दो कौडी के मोल मराठा बिकने को तय्यार नाही. आता दिल्ली काय म्हणते हे बिकाऊ आहेत. आता गेले कुठे आपले स्वत्व? मराठी रंगभूमीची पूर्णपणे इतिहास सांगणारे दालन तयार करणार मराठी भाषा भवन ज्याचे भूमिपूजन मी केले होते. आपली सत्ता जर टिकली असती तर आपण हा कार्यक्रम त्या भवनात साजरा केला असता. आणखी एक गोष्ट मी करणार होतो आणि मी नक्की करणार मराठी रंगभूमीची पूर्णपणे इतिहास सांगणारे, त्यांची वाटचाल सांगणारे दालन चौपाटीवर आहे न बिर्ला क्रीडा केंद्र तिथे मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन तिथे करणार म्हणजे करणार. ते काम आता या सरकारने रद्द केले आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कवी कुसुमाग्रज यांची कविता सादर केली. मराठी भाषेचा अभिमान म्हणजे दुसऱ्या भाषेचा अपमान अजिबात नाही. तुम्ही आमच्याकडे आल्यावर आमच्या मराठी भाषेचा मान ठेवला पाहिजे. कुसुमाग्रज म्हणाले आहेत – पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी!
माय मराठी भरते इकडे परकीचे पद चेपू नका!! भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे!
गुलाम भाषिक होउनी अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका!! कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका!
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडू नका!!