घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ:उद्यापासून नवीन किमती लागू होणार, आता राज्यात सिलिंडर 852 रुपयांना मिळेल

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी 802.50 रुपये होती, ती आता 852.50 रुपये होईल. सरकारने शेवटच्या वेळी ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती. ही बातमी अपडेट करत आहोत…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment