शैक्षणिक गुणवत्तेसाठी कल्पकता, नवनविन उपक्रमांची जोड गरजेची:स्नेहालय स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात घेवरीकर यांचे प्रतिपादन

शैक्षणिक गुणवत्तेसाठी कल्पकता, नवनविन उपक्रमांची जोड गरजेची:स्नेहालय स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात घेवरीकर यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्याला घडवताना सर्वांगीण दृष्ट्या विचार करणे महत्त्वाचे आहे. शैक्षणिक विकासबरोबर, विदयार्थ्यांचे वर्तन, चारित्र्य, नितीमुल्य, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक विकास महत्त्वाचा आहे. आजच्या काळात सर्वच शाळेत शैक्षणिक गुणवत्तेसाठी कल्पक व नवनवीन उपक्रमांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व शेवगावमधील भारदे हायस्कूल मध्ये पर्यवेक्षक उमेश घेवरीकर यांनी केले. स्नेहालय मिडियम स्कूलच्या अंतर्गत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवावस्तीतील बालकांबरोबर कार्य करणाऱ्या बालभवनमधील शिक्षकांसाठी “उपक्रमशिलता व शिक्षक’ या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या काळात लुप्त पावलेल्या आदर्श शिक्षणपद्धतीला उजाळा देणे, जीवन शिक्षण मंदिरामध्ये विदयार्थ्यांना घडवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, अध्यापनातील प्रात्येक्षिक उदाहरणे व पध्दतींचा अभ्यास कसा करावा. या सर्व बाबींवर सखोल उहापोह करण्यासाठी घेवरीकर यांना आमंत्रित केले होते. मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी प्रमुख पाहुण्यांचे ओळख व प्रस्तावना केली. घेवरीकर म्हणाले, विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शैक्षणिक साधने, प्रात्येक्षिक उदाहरणे व इतर साधने, तसेच विद्यार्थ्याला अध्यापन व अध्ययन प्रकियेत प्रत्यक्षरित्या सहभागी करुन घेणे महत्त्वाचे आहे. विविध माध्यमांद्वारे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी व आवड निर्माण करु शकतो हे शिक्षकांना प्रत्यक्षरित्या करुन दाखवले. त्यांचा “मी सानेगुरुजी बोलतोय’ हा एकपात्री अभिवाचनाचा कार्यक्रम उपस्थित सर्वांनाच भावला. या प्रशिक्षण सत्रात एकूण ६२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. सूत्रसंचलन यास्मिन सय्यद यांनी, तर आभार राजू पांढरे यांनी मानले. शिक्षकांनी मातृहृदय असणे आवश्यक विद्यार्थ्याला जर प्रात्यक्षिक रित्या शिकवले तर आयुष्यभर विसरत नाही. विद्यार्थ्यांच्या भावनेचा आदर केला तरच ते आपला आदर करतील. अभ्यास नाटिका, बालनाटिका, पथनाट्य, याद्वारे मुलांना कसे रंजक पणे शिकवता येऊ शकते. परीक्षेसाठी विद्यार्थी न घडवता त्यांना एक भावी आयुष्य देण्यासाठी शिक्षकांनी मातृहृदय असणे आवश्यक आहे, असेही घेवरीकर म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment