गोंदियात पोलिस कर्मचर्याने उचलले टोकाचे पाऊल:स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोली झाडून आत्महत्या केल्याचे समजते. हवालदार तेजराम कोरोटी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोंदियाच्या नवेगावबांध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धाबेपवनी एओपी येथे ही घटना घडली आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अधिकची माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आल्या आहेत. येथील धाबेपवनी एओपी सेंटर येथे कार्यकरत असलेल्या हवालदार तेजराम कोरोटी यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीतून स्वतःवर गोली झाडत आत्महत्या केली आहे. पोलिस हवालदार तेजराम कोरोटी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, त्यांची तिरोडा पोलिस ठाण्यात त्यांची बदली झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येचे कारण येथील पोलिस तपासून काढतीलच, मात्र पोलिस कर्मचाऱ्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोरोटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मुंबई येथील भिवंडी इथल्या शांतीनगर भागात राहणाऱ्या एका 40 वर्षीय रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फैजान शहा मोहम्मद मोमीन असे त्यांचे नाव आहे. मूळव्याधीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.