दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून:ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक, मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात

दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून:ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक, मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात

सिंहगड पायथ्यापासून अपहरण करण्यात आलेले शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर (वय ७२) यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोळेकर सिंहगड पायथ्यालगत असलेल्या पोळेकरवाडीत राहायला होते. त्यांच्या मृतदेहाचा काही भाग राजगड तालुक्यातील ओसाडे गावात सापडला असून, त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातून दोघांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोळेकर यांचा दोन कोटी रुपयांचा खंडणीसाठी खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोळेकर यांनी सप्टेंबर महिन्यात आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांकडून तक्रार दिल्याच्या रागातून त्यांचे अपहण करण्यात आले. दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे, असे चोपडे यांनी सांगितले. पोळेकर गुरुवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी साडेपाचच्या सुमारास सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले होते. पोळेकर सिंहगड पायथा परिसरात नियमित फिरायलाय जायचे. सकाळी दहा वाजल्यानंतर ते घरी परतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोळेकर यांना काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्यामुळे घाबरलेल्या पोळेकर कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोळेकर यांचा शोध न लागल्याने हवेली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोळेकर यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके तयार केली. पोळेकर कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी योगेश उर्फ बाबू किसन भामे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोळेकर आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांना आरोपी योगेश भामे याने दोन वर्षांपूर्वी खंडणी मागितली होती. पोळेकर यांना एका रस्त्याचे काम मिळाले होते. या कामात भामेने अडथळा आणला, तसेच काम पूर्ण करुन देण्यासाठी भामेने त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणी आणि महागडी मोटार मागितली. पाेळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिला. खंडणी न दिल्याने निर्घृण खून शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांनी दोन कोटींची खंडणी न दिल्याने त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपी योगेश भामे आणि साथीदारांनी पोळेकर यांचे अपहरण केले. शनिवारी सायंकाळी खडकवासला धरण परिसरात पोळेकर यांच्या मृतदेहाचा काही भाग खडकवासला धरण परिसरात सापडला. मृतदेहाचा उर्वरित भाग छिन्नविच्छन्न अवस्थेत राजगड तालुक्यातील ओसाडे गावात सापडला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment