एस.टी. कर्मचाऱ्यांबाबत सरकारने आपला शब्द फिरवला:पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार; श्रीरंग बरगे यांची सरकारवर टीका

एस.टी. कर्मचाऱ्यांबाबत सरकारने आपला शब्द फिरवला:पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार; श्रीरंग बरगे यांची सरकारवर टीका

एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांनाच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची पगारवाढ एप्रिल २०२० पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लीच झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल २०२० पासून नाही तर सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. ही एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल २०२० पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती. व ती दिलेल्या आश्वासना प्रमाणे झाली असती तर साधारण ३२०० कोटी रुपयांच्या रक्कमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता.पण मिनिट्स काढताना एसटी आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर फरक दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे असेही बरगे यांनी म्हटले आहे. या शिवाय बाकी मुद्यांवर तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वार्षिक वेतनवाढ प्रलंबित फरकाबद्दल सुद्धा मिनिट्स मध्ये स्पष्टता नसून महागाई भत्त्याच्या थकबाकी बद्दल सुद्धा काहीही स्पष्टता नाही.२०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून २०१८ पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कमही प्रलंबित आहे . या दोन्ही रकमा मिळून एकूण अंदाजे १२०० कोटी रुपयांची रक्कम देण्यात कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश जायचे:विरोधकांकडून भक्ती-श्रद्धेचा अपमान; फडणवीसांचे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, विरोधकांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीश तेथे जात होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला गेल्यामुळे इतका गहजब का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांनाच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची पगारवाढ एप्रिल २०२० पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लीच झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल २०२० पासून नाही तर सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. ही एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल २०२० पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती. व ती दिलेल्या आश्वासना प्रमाणे झाली असती तर साधारण ३२०० कोटी रुपयांच्या रक्कमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता.पण मिनिट्स काढताना एसटी आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर फरक दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे असेही बरगे यांनी म्हटले आहे. या शिवाय बाकी मुद्यांवर तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वार्षिक वेतनवाढ प्रलंबित फरकाबद्दल सुद्धा मिनिट्स मध्ये स्पष्टता नसून महागाई भत्त्याच्या थकबाकी बद्दल सुद्धा काहीही स्पष्टता नाही.२०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून २०१८ पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कमही प्रलंबित आहे . या दोन्ही रकमा मिळून एकूण अंदाजे १२०० कोटी रुपयांची रक्कम देण्यात कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश जायचे:विरोधकांकडून भक्ती-श्रद्धेचा अपमान; फडणवीसांचे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, विरोधकांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीश तेथे जात होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला गेल्यामुळे इतका गहजब का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment