क्लॅट परीक्षेत आधी उत्तरपत्रिका, निकालात घाेटाळा:आता रँकिंगमध्ये गडबड, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची समीकरणेच बदलली

कॉमन लॉ ॲडमिशन टेस्टमधील (क्लॅट) चुकांनी कळस गाठला आहे. उत्तरपत्रिकेतील चुका दुरुस्त केल्यानंतर निकालात चुका झाल्या. आता रँकिंगमध्येही अनियमितता सुरू झाली आहे. परिणामी ज्यांना पूर्वी सहज प्रवेश मिळत होता त्यांना तो अवघड झाला. ज्यांचा प्रवेश अवघड होता त्यांचा मार्ग सुकर झाला. काही विद्यार्थ्यांना पूर्वी चांगल्या विद्यापीठांत प्रवेश मिळत होता, मात्र आता निम्न दर्जाच्या विद्यापीठांत प्रवेश घ्यावा लागेल. कारण म्हणजे एनएलयूच्या कन्सोर्टियमने कोणतीही सूचना न देता अनेक विद्यार्थ्यांचे निकाल बदलले. उल्लेखनीय बाब म्हणजे क्लॅट २०२५ ची तात्पुरती ‘ॲन्सर की’ २ डिसेंबरला प्रसिद्ध झाली. यात विद्यार्थी व तज्ज्ञांना अनेक प्रश्न व उत्तरे चुकीची आढळली. अंतिम ‘ॲन्सर की’ जारी करण्याची टाइमलाइन ९ डिसेंबर आणि निकाल १० डिसेंबर क्लॅट : आधी ‘आन्सर की’ नंतर निकाल, आता रँकिंगमध्ये गडबडप्रसिद्ध करण्यात आला. नंतर कन्सोर्टियमने कोणतीही अधिसूचना जारी न करता ७ डिसेंबरला रात्री ११ ला अंतिम ‘ॲन्सर की’सह अंतिम निकालही जाहीर केला. तो सुधारित उत्तरपत्रिकेसह घोषित केला.या निकालातही चुका झाल्या आहेत. या निकालांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूडी श्रेणीमध्ये अर्ज केला नाही, त्यांना पीडब्ल्यूडी रँकिंग देण्यात आले. जेव्हा दैनिक भास्करने ही बाब उघड केली तेव्हा एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक विद्यार्थ्यांना न कळवताच घाईघाईने त्यांचे निकाल बदलून टाकले. तक्रारींची शेवटची तारीख ठरली नाही… पोर्टलवर जारी माहितीमध्ये कन्सोर्टियमने म्हटले की, विद्यार्थी ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ पासून तक्रारी नोंदवू शकतात. परंतु कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. तक्रारी दाखल करण्याची शेवटची तारीख कोणती, हे अद्याप विद्यार्थ्यांना समजू शकलेले नाही? त्याच वेळी तक्रारींचे निराकरण न करता सोमवारी समुपदेशनही सुरू केले. क्लॅट तज्ज्ञ सागर जोशी म्हणाले की, कन्सोर्टियम क्लॅट प्रक्रियेत सतत चुका करत आहे. अनेक विद्यार्थी निकाल बदलाच्या तक्रारी करत आहेत. तक्रारी दाखल करण्याची शेवटची तारीखही कळवली नाही. तक्रारींचा निपटारा न करता समुपदेशन सुरू केले. जुलैमध्ये प्रवेश होणारच असतील तर एवढी घाई कशाला? हे घ्या पुरावे… कुणाची रँक ३५८ वरून ७० वी, तर कुणाची ३२१ वरून ६२ वी केस १; जोधपूरचा अध्ययन रतनू
आधी पीडब्ल्यूडी श्रेणीत २०वी रँक सांगितली. त्याने याच श्रेणीत अर्जही केला होता. मात्र, आता पीडब्ल्यूडी श्रेणी हटवली. आधी त्याला टॉप-5 विद्यापीठांत प्रवेश मिळाला होता. आता २६ विद्यापीठांपैकी कोणत्याच विद्यापीठामध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. केस २; लखनऊचा दिव्य राज सिंह
आधी पीडब्ल्यूडी श्रेणीत ३५८वी रँक आली होती. सोमवारी बदलून ७०वी केली. समुपदेशनासाठी पुढे गेला तेव्हा त्याची रँक ७३वी केली. अशा वेळी आधीपासूनच त्याला एकाही विद्यापीठात प्रवेश मिळत नव्हता. आता मार्ग सोपा. केस ३; दिल्लीची धैर्या साहनी
आधी जाहीर निकालात पीडब्ल्यूडी श्रेणीत दुसरी रँक होती. सोमवारी निकाल पाहिला तर रँक १२वी झाली. आधी टॉप विद्यापीठांत सहज प्रवेश मिळाला असता. आता ५वी ते ७वी रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश मिळेल. केस ४; जयपूरचा आदित्य शुक्ला आधी पीडब्ल्यूडीमध्ये ३२१वी रँक सांगितली जात होती. सोमवारी त्याच्या निकालातही दुरुस्ती झाली आणि आता या श्रेणीत ६२वी रँक असल्याचे सांगितले जात आहे. आधी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळत नव्हता. आता त्याच्या प्रवेशाची शक्यता आहे.

Share