आधी वापरले, सत्ता आल्यावर OBC नेतृत्वाला डावलले:भुजबळांवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा, ओबीसींचे खच्चीकरण करण्याची टीका

आधी वापरले, सत्ता आल्यावर OBC नेतृत्वाला डावलले:भुजबळांवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा, ओबीसींचे खच्चीकरण करण्याची टीका

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेण्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसींचा वापर करायचा आणि फेकून द्यायचे, अशी सरकारची भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलने म्हणजे राज्यातील ओबीसींचे खच्चीकरणे करण्याचा उद्देश असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. महायुती सरकारचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. नव्या सरकारमध्ये 39 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. यामध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अनेक नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. यामुळे छगन भुजबळ यांनीही आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. वापरा आणि फेका अशी सरकारची भूमिका
महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मागे उभे राहणारे नेतृत्व म्हणून आम्ही छगन भुजबळांकडे पाहत होतो. आम्हीही ओबीसी समाजासाठी लढत होतो. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा महायुतीच्या तीनही पक्षांना तसेच सरकारला झाला. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना डावलून ओबीसींचा वापर करायचा आणि फेकून द्यायचे, अशी भूमिका सरकारची दिसत असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ओबीसींचे खच्चीकरण करण्याचा उद्देश
छगन भुजबळ समस्त ओबीसी समाजाचे नेतृत्व करत होते. ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींमध्ये छगन भुजबळांचे नाव अग्रेसर आहे. त्यांचा निवडणुकीत फायदा झाल्याचे सत्तेतील सर्वच मंडळी म्हणतात. ओबीसींच्या हक्कासाठी, समाजाचा वाटा कोणी घेऊ नये, यासाठी लढणारे भुजबळ होते. त्यांना मंत्रिमंडळातून डावलने म्हणजे राज्यातील ओबीसींचे खच्चीकरणे करणे, हा त्या मागचा उद्देश असे, म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे ही वाचा… ‘होय मी नाराज’; छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया:राज्यसभेची ऑफर धुडकावली; मनधरणीचे प्रयत्न, पक्षात महत्त्वाचे पद मिळणार ‘होय मी नाराज आहे’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘होय मी नाराज आहे, पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे’ असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. सविस्तर वाचा… मना विरोधात घडत असताना पुढे जाणारा खरा कार्यकर्ता:मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, सांगितली पुढील भूमिका राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद डावलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात उपस्थित असून देखील सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याचे समोर आले आहे. पावला पावलांवर मना विरोधात घडत असताना जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. सविस्तर वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment