हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस:त्यांची काँग्रेस बुडवण्यासाठी नेमणूक झाली; फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना केल्याने नारायण राणे संतप्त

हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस:त्यांची काँग्रेस बुडवण्यासाठी नेमणूक झाली; फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना केल्याने नारायण राणे संतप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोगल बादशहा औरंगजेबाशी तुलना केल्याप्रकरणी भाजप खासदार नारायण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस असून, त्याची काँग्रेस बुडवण्यासाठीच नियुक्ती झाली आहे, असे ते म्हणालेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. औरंगजेब एक क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते माजी मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी लोक काय म्हणतात? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्या माणसाचा दाखला देत आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणारा माणूस मूर्खच असला पाहिजे. त्यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. अध्यक्षपदाचा वापर कोणत्या विषयावर करायचा हे ही त्यांना माहिती नाही. त्यांची नियुक्ती काँग्रेस वाढवण्यासाठी नाही तर ती बुडवण्यासाठी झाली आहे, असे ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचा संपूर्ण राजकीय इतिहास काढण्याचा सल्लाही भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मी काँग्रेसमध्ये कोणतीही महत्त्वकांक्षा घेऊन गेलो नव्हतो. हा जुना विषय आहे. मी आता काँग्रेसमध्ये नाही. मला त्या विषयात पडायचेही नाही. पण हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय इतिहास काय? महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान काय? त्यांनी इतर विषयांवर बोलण्यापेक्षा या मुद्यावर बोलावे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुढील 6 महिन्यांत आणखी एका मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा दावा केला आहे. नारायण राणे यांनी यावरही आपले मत व्यक्त केले. याविषयी सरकारच्या गृहखात्यने पहावे. असे विधान करणे एक गुन्हा आहे. सरकारने यावर योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न – बावनकुळे दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याची टीका केली आहे. औरंगजेबाने धर्माच्या नावावर हिंदूंचे शिरकाण केले, मंदिरे पाडली, कर लादले. याऊलट देवेंद्र फडणवीस सर्वांना सोबत घेऊन कायद्याच्या चौकटीत राज्यशकट हाकत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची तुलना औरंगजेबाशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसने खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. ती सपकाळ व काँग्रेसला जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले. जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंग्याची क्रूरता बघा. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी माझ्या टीममध्ये होते. आता ते मुख्यमंत्री आहेत. आमची टीम आहे. आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन केला. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा होता. त्यामुळे फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ते ऐकले नाही. पण देवेंद्र फडणवीस असो की आणखी कुणी असो, कुणाचीही अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही, असे ते म्हणालेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment