​​​​​​​हरियाणात भाजपच्या मित्रपक्षांना शून्य जागा:एकनाथ शिंदे, अजित पवारांनी धडा घ्यावा, शरद पवार गटाचा शिवसेना, NCP ला इशारा

​​​​​​​हरियाणात भाजपच्या मित्रपक्षांना शून्य जागा:एकनाथ शिंदे, अजित पवारांनी धडा घ्यावा, शरद पवार गटाचा शिवसेना, NCP ला इशारा

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपने आघाडी केलेल्या पक्षांचा पूर्णतः सफाया झाला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपचे मित्रपक्ष संपवले जातील हे स्पष्ट आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर सत्तेचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 37 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत जननायक जनता पक्षाला (जेजेपी) सर्वात मोठा फटका बसला. 2019 च्या निवडणुकीत या पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या. पण यंदा त्यांना भोपाळाही फोडता आला नाही. या निकालाचे थेट परिणाम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. पण आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे, अजितदादांनी धडा घ्यावा रोहित पवार म्हणाले, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला यंदाच्या निवडणुकीत शून्य जागा मिळाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रात 2029 मध्ये स्वबळावर भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला होता. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपचे मित्रपक्ष संपवले जातील हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहिजे. उल्लेखनीय बाब म्हणजे जेजेपी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरली होती. स्वतः पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री राहिले होते. असे असतानाही यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत कलान विधानसबा मतदारसंघातून दुष्यंत चौटाला यांना 92 हजार 504 मते मिळाली होती. पण यावेळी त्यांना केवळ 7 हजार 950 मते मिळाली. ते थेट 5 व्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे हरियाणात भाजपचा विजय झाला असला तरी 2019 साली त्यांनी ज्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती, त्यांचा यावेळी पूर्णतः सफाया झाला आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो याची खमंग चर्चा देशाच्या राजकारणात रंगली आहे.

​हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपने आघाडी केलेल्या पक्षांचा पूर्णतः सफाया झाला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपचे मित्रपक्ष संपवले जातील हे स्पष्ट आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर सत्तेचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 37 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत जननायक जनता पक्षाला (जेजेपी) सर्वात मोठा फटका बसला. 2019 च्या निवडणुकीत या पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या. पण यंदा त्यांना भोपाळाही फोडता आला नाही. या निकालाचे थेट परिणाम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. पण आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे, अजितदादांनी धडा घ्यावा रोहित पवार म्हणाले, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला यंदाच्या निवडणुकीत शून्य जागा मिळाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रात 2029 मध्ये स्वबळावर भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला होता. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपचे मित्रपक्ष संपवले जातील हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहिजे. उल्लेखनीय बाब म्हणजे जेजेपी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरली होती. स्वतः पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री राहिले होते. असे असतानाही यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत कलान विधानसबा मतदारसंघातून दुष्यंत चौटाला यांना 92 हजार 504 मते मिळाली होती. पण यावेळी त्यांना केवळ 7 हजार 950 मते मिळाली. ते थेट 5 व्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे हरियाणात भाजपचा विजय झाला असला तरी 2019 साली त्यांनी ज्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती, त्यांचा यावेळी पूर्णतः सफाया झाला आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो याची खमंग चर्चा देशाच्या राजकारणात रंगली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment