आरोग्य विभागातील कोणत्याही कामांना स्थगिती नाही:तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही

तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री असताना मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिल्याची चर्चा होती. मात्र, आता चर्चांवर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोग्य विभागाच्या कामांना कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. घोटाळा झाल्याचा आरोप झाला, पण सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी अशिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला. मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नाही
गेल्या दोन दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरु आहे, त्या विषयाची माहिती घेणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3 हजार 190 कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी 108 गाड्यांच्या बाबतीत 10 हजार, 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण आभासी जगात जगायचे आणि घोटाळे झाले म्हणायचे. एखाद्याला बदनाम करायचे हे चुकीचे आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत, असे तानाजी सावंत म्हणाले. 2500 हॉस्पिटल स्वच्छता 70 कोटीत शक्य आहे का?
माझ्या कार्यकाळात अनेक चांगले कामं केली. 70 कोटींत महाराष्ट्रातील 2500 हजार हॉस्पिटल साफसफाई करणे सोपे होते का? वैद्यकीय विभागाची ऑर्डर झाली होती. माझ्या खात्याने 84 रुपये पर स्क्वेअरफुटने ठरवले. हायकोर्टात आपलेच काही लोकं गेली. 12 लोकांनी कॉम्पिट केले, वर्क ऑर्डर झाली, एमओयू झाले, महाराष्ट्र शासनातील एक रुपयाचाही काँट्रॅक्ट दिले. हॉस्पिटल मध्ये येणारा रोजंदारी करणारा वर्ग आहे. मोफत उपचार सुरू केले. अडीच हजार हॉस्पिटल स्वच्छता ही 70 कोटीत शक्य आहे का? असा सवालही तानाजी सावंत यांनी यावेळी विचारला. आबिटकरांनी राऊतांसाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक जागा ठेवावी
शासन म्हणून धोरणात्मक निर्णय घेण आमचे काम असते. टोटल टेंडर 12 हजार कोटींचा असेल तर 12 हजार कोटी म्हणायचे. कुठेही एक रुपया खर्च झाला नाही. हायकोर्टाच्या आदेशाने निर्णय होईल सांगितले. कुत्रा चावतो तर कुत्र्याला चावायचे का? मी कालही म्हटले होते संजय राऊतला मेंटल हॉस्पिटल मध्ये एक जागा रिक्त ठेवली. मी आजही सांगतो, प्रकाश आबिटकरांनी एक सीट ठेवावी, अश शब्दांत तानाजी सावंत यांनी संजय राऊतांवर टीका केली. माझ्या जागेवर असते तर आव्हाडांनीही तेच केले असते
तानाजी सावंत बँकॉकला जाणाऱ्या मुलासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली होती. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर तोंडसुख देखील घेतले. याबाबत तानाजी सावंतांना प्रश्न विचारला असता, कायदेभंग असेल तर कायदेशीर कारवाई चालू करावी. वडील म्हणून, मला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला. सगळ्यांकडून विनंती केली आहे, असे ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड जर माझ्या जागेवर असते तर त्यांनीही तेच केले असते. मी पॅनिक झालो होतो, माझा परिवार पॅनीक झाला होता, असे तानाजी सावंत म्हणाले. कामांच्या स्थगितीबाबत फडणवीस काय म्हणाले?
आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आरोग्य विभागाच्या बाबतीत केंद्र सरकारने जे काही पैसे आपल्याला दिले होते, त्यामध्ये आपण जे काही कामे सुचवली होती, त्या कामांमध्ये 9 टक्के पैसा खर्च केला होता. त्यावर केंद्र सरकारचे म्हणणे होते की, तो पैसा 5 टक्के केला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे आपल्याला कळवले. त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी माहिती मागवली की, कोणती कामे प्रायोरिटीने करायची. पण अशा पद्धतीची फाईल माझ्याकडे आलेली नाही आणि मी त्यावर कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.