असहाय बेरोजगार; काहींना कामाची, काहींना कमाईची चिंता:14 माेठ्या राज्यांत सर्वाधिक बेराेजगारी केरळमध्ये
भरतीवेळी प्रत्येक पदासाठी हजारो अर्ज येतात. एमए-पीएचडी झालेलो लिपिक, शिपाई, सफाई कामगार अशा नोकऱ्यांसाठी रांगेत उभे दिसतात. पण सरकारच्या निकषांनुसार कार्यप्रवण लोकसंख्येतील दर १०० पैकी फक्त ३ बेरोजगार आहेत. कारण, आठवड्यातून एक तासही काम केले तर ‘सरकार’च्या नजरेत तुम्ही बेरोजगारांच्या यादीतून बाहेर पडता. बेरोजगार संख्या जास्त नाही तर नोकरी करणाऱ्यांपैकी ७८% लोक दरमहा ₹१४ हजारही कमावत नाहीत. कमावणाऱ्यांमध्ये ५८% वाटा स्वयंराेजगार असणाऱ्यांचा आहे. त्यांची सरासरी मासिक कमाई १३,२७९ रु.आहे. २२% कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न २०,७०२ रुपये आहे. २०% सहभागासह मजुरांची सरासरी रोजची कमाई ४१८ रुपये आहे. आकड्यांमध्ये बेराेजगारी कमी, याचे सर्वात माेठे कारण आपले निकष देशात बेरोजगारी दोन प्रकारे मोजली जाते. प्रथम – सामान्य परिस्थिती. यामध्ये वर्षातील ३६५ दिवसांमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काम केले असेल तर बेरोजगार मानले जात नाही. दुसरे- वर्तमान साप्ताहिक स्थिती. यामध्ये तुम्ही आठवड्यात कोणत्याही दिवशी १ तासही काम केले तर तुम्हाला बेरोजगार मानले जाणार नाही. …जर अमेरिकेत लोकांनी गेल्या ४ आठवड्यांत सक्रियपणे काम शोधले असेल आणि सध्या कामासाठी उपलब्ध असेल तर त्यांना बेरोजगार म्हणून वर्गीकृत केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला नोकरीतून काढून टाकण्यात आले असेल आणि सध्या कोणतेही काम नसेल. परंतु त्याला परत बोलावणे अपेक्षित असल्यास तो बेरोजगार समजला जाईल. अांतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मत १५ते ७४ वर्षे वयोगटातील व्यक्ती ज्याला नोकरी नाही अशा व्यक्तीला बेरोजगार म्हणून वर्गीकृत केले जाते. दुसरे – सर्वेक्षणापूर्वी ४ आठवडे सक्रियपणे कामाचा शोध घेतलेल्या किंवा दोन आठवड्यांच्या आत नोकरी सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या व्यक्तीला बेरोजगार मानले जाते. ज्या लोकांना दोन्हीपैकी कोणतीही व्याख्या लागू होत नाही त्यांना निष्क्रिय लोकसंख्या म्हणून वर्गीकृत केले जाते. ४ राज्यांचेही आकडे सांगतात स्थिती किती बिकट? उत्तर प्रदेश : २०२४ च्या प्रारंभी पोलिस भरतीत ६० हजार पदांसाठी ५० लाख अर्ज आले.
बिहार: जुलै २०२३ मध्ये बिहार स्टाफ सिलेक्शनने १२,१९९ पदांसाठी भरती आयोजित केली होती. २५ लाख अर्ज प्राप्त झाले. म्हणजे एका पदासाठी २०० हून अधिक. त्याद्वारे निम्न विभाग लिपिक, महसूल कर्मचारी, लेखापाल, पंचायत सचिव, टंकलेखक पदांसाठी भरती हाेणार होती.
हरियाणा: एसएससी सीईटी २०२३ मध्ये १३,५३६ पदांसाठी १३,७५,१५१ अर्ज आले.
गुजरात : डिसेंबर २०२३ मध्ये सब-ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाने(जीएसएसएसबी) २५०० तांत्रिक पदांसाठी भरती आयोजित केली. एक लाखाहून अधिक जणांनी परीक्षा दिली. केंद्रीय सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या २६,००० पदांसाठी ४७ लाख अर्ज प्राप्त झाले हाेते.