हेरगिरीचे जाळे:ज्योतीच्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये रडार, बीएसएफच्या हालचालींचे व्हिडिओ, महिला यूट्यूबरची एनआयएकडून चौकशी

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची सोमवारी एनआयए (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा), जम्मू-काश्मीर पोलिस आणि गुप्तचर विभागाने चौकशी केली. तिच्याकडून दहशतवाद्यांशी असलेल्या संपर्काबद्दल प्रश्न विचारण्यात आले उच्चपदस्थ गुप्तचर सूत्रांनुसार, ज्योती अनेक महिन्यांपासून गुप्तचर संस्थांच्या रडारवर होती. तिचे संशयास्पद प्रवास, परदेशी संपर्क आणि यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले संवेदनशील व्हिडिओ हे त्याचे आधार होते. डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत तिच्या विदेश दौऱ्यांसोबतच पठाणकोट, नाथू ला पास आणि अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये संशयास्पद हालचालींचे पुरावे मिळाले. ज्योतीचे स्मार्टफोन आणि लॅपटॉपची लोकेशन हिस्ट्री, फोटो मेटाडेटा आणि क्लाऊड स्टोरेजने रणनीतिक आणि सीमावर्ती भागांमधील व्हिडिओ रेकॉर्डिंगकडे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले. कॉल डिटेल रेकॉर्ड्््समध्ये एक आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या संपर्कांशी सतत संभाषण आढळले. क्लाऊड स्टोअरेजमध्ये मिळालेल्या व्हिडिओमध्ये बीएसएफची (सीमा सुरक्षा दल) हालचाल, रडारचे ठिकाण आणि अतिसुरक्षित क्षेत्र यांची छायाचित्रे व व्हिडिओ आहेत. भारतातून हद्दपार करण्यात आलेला पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचा कर्मचारी दानिश याच्याशी संबंधित बनावट प्रोफाइल्ससोबत चॅट आणि ग्रुप मेंबरशिप आढळली. ‘हाय रिस्क’ असलेल्या देशांना भेट देणाऱ्यांवर असते नजर पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, इराण किंवा उत्तर कोरियासारख्या उच्च धोका असलेल्या देशांमध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर एक संघटित आणि समन्वित यंत्रणा लक्ष ठेवते. हे अनेक स्तरांवर होते… १. व्हिसा मंजुरी : पाकिस्तानसाठी ‘नॉर्मल व्हिसा क्लिअरन्स’ (सामान्य व्हिसा मंजुरी) नसते. परराष्ट्र मंत्रालयाच्या तपासानंतर विशेष प्रकरणांमध्येच मंजुरी मिळते. एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) आणि पॉलिटिकल क्लीयरन्स (राजकीय मंजुरी) देखील असते. २. गुप्तचर तपास : आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) आणि रॉ (रिसर्च अँड एनालिसिस विंग) उच्च धोका असलेल्या ठिकाणी जाणाऱ्यांची तपासणी करतात. संशयितांवर नजर ठेवली जाऊ शकते. ३. इमिग्रेशन अलर्ट : ब्युरो ऑफ इमिग्रेशन प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास तपासते, मागोवा घेते. संशयितांची नावे लूकआऊट सर्क्युलरमध्ये टाकून प्रत्येक प्रवासावर लक्ष ठेवले जाते. उत्तर भारतातून अवघ्या दोन आठवड्यांत १२ हेरांना झाली अटक ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात किमान १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५ पंजाबमधील, ६ हरियाणातील आणि १ उत्तर प्रदेशातील आहे. त्यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. पंजाबमधील गुरदासपूरमधून सोमवारी दोघांना अटक करण्यात आली. माहितीच्या बदल्यात त्यांना पाकिस्तानातून एक लाख रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये स्फोट घडवण्याच्या षड‌्यंत्राच्या आरोपात सिराज उर रहमान आणि सय्यद समीर नावाच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली. नूंहमध्ये अटक झालेला म्हणाला; सिरसा एअरबेसचे व्हिडिओ हवे हाेते नूंह (हरियाणा)| हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणातील नूंह येथून मोहंमद तारिफला अटक झाली. तावडू पोलिस ठाण्यात त्याच्यासह पाक उच्चायुक्तालयात तैनात आसिफ बलोच आणि जफर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. एका व्हिडिओमध्ये तारिफने कबूल केले की तो अनेक वेळा पाकिस्तानला गेला व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये व्हिसासाठी तो पाक दूतावासात गेला. एका अधिकाऱ्याने दोन सिमकार्डच्या बदल्यात त्याला व्हिसा दिला. परतल्यानंतर त्याच अधिकाऱ्याने इतरांना व्हिसाच्या बदल्यात पैशांची ऑफर दिली. २०२४ मध्ये तो दुसऱ्या अधिकारी जफरला भेटला. त्यानेही सिम कार्ड मागितले. लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्याला सिरसा एअरबेसचे फोटो व व्हिडिओ पाठवण्यास सांगण्यात आले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment