हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार:वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यावर मोठा निर्णय घेण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार:वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यावर मोठा निर्णय घेण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या ज्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या परत करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी आपल्याला दाव्याने सांगतो की, संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्यात काय काय तरतुदी मंजूर झाल्या ते पाहण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील पुढाकार घेऊन हिंदू शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि संस्थानाच्या तसेच मुस्लिम समाजाच्या देखील ज्या जमिनी वक्फ बोर्डाने मोगलाई करुन बळजबरीने ताब्यात घेतल्या आहेत. त्या परत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र सरकार नक्कीच पुढाकार घेईल, ज्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या परत केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे गटावर टीका वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील मतदानावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नसतील तर त्यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात वॉक आउट करणे म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणे आहे. असे देखील ते म्हणाले. त्यामुळे वॉक आउट न करता विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. तरी देखील पक्षाचे खासदार संजय राऊत म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद यांचा एक सपोर्ट दिला आहे. पण फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहे ती चुकीची आहे. हिंदुंत्व हिंदुंत्वाच्या जागी आहे, तर अशी बिले त्यांच्या जागी. आम्ही 370 बिलाला, तिहेरी तलाकला विरोध केला नाही. वक्फ बोर्डासंदर्भात संध्याकाळी मतदान असून त्यामुळे आम्ही नंतर भूमिका जाहिर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment