हिंगोलीच्या सिंदगी शिवारात भीषण अपघात:कार व दुचाकीची जोरदार धडक, दोघे ठार तर एक जखमी

हिंगोलीच्या सिंदगी शिवारात भीषण अपघात:कार व दुचाकीची जोरदार धडक, दोघे ठार तर एक जखमी

सिंदगी ते कुरुंदा मार्गावर सिंदगी गावाजवळ भारधाव कार ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता ७ दुपारी घडली आहे . वसमत तालुक्यातील कोठारवाडी येथील चंद्रकांत मारुती मिटकर (२६) व त्यांचा सहकारी शंभू हनवता मिटकर (५४) हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी बोल्डा येथील आठवडी बाजारासाठी आले होते. दुपारच्या वेळी बाजारातून काम आटोपून दोघेही गावाकडे निघाले होते. यावेळी सिंदगी गावाजवळ शंभू यांचा मुलगा मारोती मिटकर हा भेटला. त्यामुळे तिघेही त्याठिकाणी बोलत उभे राहिले होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या ठिकाणी उभे असलेले चंद्रकांत यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारोती व शंभू हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळतात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. बसवंते, जमादार पंढरी चव्हाण, राजेश मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शंभू व त्यांचा मुलगा मारोती यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असताना शंभू यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातातील जखमी मारोती याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कारचालकाने कार घटनास्थळी सोडून पळ काढला. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणली आहे. तर कारचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या अपघातातील मयत झालेले चंद्रकांत व शंभू हे दोघे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment