हिंगोलीच्या नवीन वसाहतींची तहान भागणार, 84 कोटींचा प्रकल्प मंजूर:लवकरच कामाला सुरवात होणार, रामदास पाटलांकडून आभार

हिंगोली शहरातील नवीन वसाहतींसाठी शासनाने ८४ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून यामुळे शहरातील नवीन वसाहतींची तहान भागवणार आहे. शासनाने प्रकल्प मंजूर केल्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे. हिंगोली शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा पुरविणे कठीण जात आहे. त्यातही पालिकेने योग्य नियोजन करून जास्तीत जास्त सुविधा देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र नवीन वसाहतीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या वसाहतींमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी देण्याची मागणी ेकेली जात होती. त्यानुसार पालिकेने वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र अनेक वेळा पाठपुरावा करून त्यातील त्रुटी दुर केल्यानंतर अखेर शासनाने या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या संदर्भात भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी सांगितले की, याप्रकल्पामध्ये आदर्श नगर, श्रीकृष्ण नगर, तिरुपती नगर या ठिकाणी स्वतंत्र जलकुंभ उभारले जाणार आहेत. तसेच ७७ किलो मिटर अंतराच्या जलवाहिन्या अंथरल्या जाणार असून त्यातून पाणी पुरवठा केला जाईल. सध्या असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेला विज पुरवठ्याचा वारंवार फटका बसत असून या ठिकाणी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर उभारले जाणार आहे. तसेच सोलार प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. यामुळे उर्जेची बचत होऊन पालिकेला फायदा होणार असल्याचे त्योंनी स्पष्ट केले. सदर प्रकल्प मंजुरीसाठी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​हिंगोली शहरातील नवीन वसाहतींसाठी शासनाने ८४ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून यामुळे शहरातील नवीन वसाहतींची तहान भागवणार आहे. शासनाने प्रकल्प मंजूर केल्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे. हिंगोली शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा पुरविणे कठीण जात आहे. त्यातही पालिकेने योग्य नियोजन करून जास्तीत जास्त सुविधा देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र नवीन वसाहतीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या वसाहतींमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी देण्याची मागणी ेकेली जात होती. त्यानुसार पालिकेने वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र अनेक वेळा पाठपुरावा करून त्यातील त्रुटी दुर केल्यानंतर अखेर शासनाने या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या संदर्भात भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी सांगितले की, याप्रकल्पामध्ये आदर्श नगर, श्रीकृष्ण नगर, तिरुपती नगर या ठिकाणी स्वतंत्र जलकुंभ उभारले जाणार आहेत. तसेच ७७ किलो मिटर अंतराच्या जलवाहिन्या अंथरल्या जाणार असून त्यातून पाणी पुरवठा केला जाईल. सध्या असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेला विज पुरवठ्याचा वारंवार फटका बसत असून या ठिकाणी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर उभारले जाणार आहे. तसेच सोलार प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. यामुळे उर्जेची बचत होऊन पालिकेला फायदा होणार असल्याचे त्योंनी स्पष्ट केले. सदर प्रकल्प मंजुरीसाठी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

Share