हिंगोलीत प्रतिकुल शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा देण्याच्या हालचाली:50 गावांत नुकसानीचे सर्वेक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

हिंगोलीत प्रतिकुल शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा देण्याच्या हालचाली:50 गावांत नुकसानीचे सर्वेक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

हिंगोली जिल्हयात प्रतिकुल परिस्थिीतीच्या अधिसुचनेच्या माध्यमातून पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीण रक्कम देण्याच्या हालचाली प्रशासकिय पातळीवरून सुरु झाल्या असून जिल्हयातील 50 गावांतून नुकसानीच्या सर्वेक्षण अहवालानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पिकविमा काढलेल्या 4.72 लाख शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्हयात ता. 1 व ता. 2 सप्टेंबर या कालावधीत एकूण 141 मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे सोयाबीन, हळद, कापूस, तुर, ज्वारी, उडीद, मुग, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उडीद, मुगाचा हाती आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे तर सोयाबीनला शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिक पिवळे पडू लागले आहे. या शिवाय इतर पिकांची परिस्थिती देखील सारखीच आहे. दरम्यान, जिल्हयात पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यतील 30 महसुल मंडळात किंवा तालुक्याच्या 10 ठिकाणी सोयाबीन, कापूस, तुर या पिकांची ठिकाणे निवडून त्या ठिकाणी पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित केली जाणार आहे. त्याबाबतच्या सुचना कृषी सहाय्यकांना व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हयातील 30 महसुल मंडळातील क्षेत्र निवड करून त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली जात आहे. यामध्ये नदी, नाल्या काठच्या पिकांसोबतच इतर ठिकाणच्या पिक नुकसानीची माहिती घेऊन त्यातून नुकसानीची टक्केवारी काढली जात आहे. यामध्ये नेमके कोणत्या पिकांची किती टक्के नुकसान झाले याचा अहवाल तयार केला जाणार आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास समितीकडून हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती अधिसुचना निर्गमीत करून शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम देण्याबाबत विमा कंपनीला सुचना दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता या सर्वेॅक्षणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 2.93 लाख शेतकऱ्यांनी दिली माहिती हिंगोली जिल्हयात 4.72 लाख शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासात विमा कंपनीला देणे आवश्‍यक आहे. त्यानुसार 2.93 लाख शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांकडून ऑफलाईन माहिती घेऊन विमा कंपनीनेच ऑनलाईन नोंद करण्याच्या सुचना कृषी विभागाने विमा कंपनीला दिल्या आहेत.

​हिंगोली जिल्हयात प्रतिकुल परिस्थिीतीच्या अधिसुचनेच्या माध्यमातून पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीण रक्कम देण्याच्या हालचाली प्रशासकिय पातळीवरून सुरु झाल्या असून जिल्हयातील 50 गावांतून नुकसानीच्या सर्वेक्षण अहवालानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पिकविमा काढलेल्या 4.72 लाख शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्हयात ता. 1 व ता. 2 सप्टेंबर या कालावधीत एकूण 141 मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे सोयाबीन, हळद, कापूस, तुर, ज्वारी, उडीद, मुग, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उडीद, मुगाचा हाती आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे तर सोयाबीनला शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिक पिवळे पडू लागले आहे. या शिवाय इतर पिकांची परिस्थिती देखील सारखीच आहे. दरम्यान, जिल्हयात पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यतील 30 महसुल मंडळात किंवा तालुक्याच्या 10 ठिकाणी सोयाबीन, कापूस, तुर या पिकांची ठिकाणे निवडून त्या ठिकाणी पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित केली जाणार आहे. त्याबाबतच्या सुचना कृषी सहाय्यकांना व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हयातील 30 महसुल मंडळातील क्षेत्र निवड करून त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली जात आहे. यामध्ये नदी, नाल्या काठच्या पिकांसोबतच इतर ठिकाणच्या पिक नुकसानीची माहिती घेऊन त्यातून नुकसानीची टक्केवारी काढली जात आहे. यामध्ये नेमके कोणत्या पिकांची किती टक्के नुकसान झाले याचा अहवाल तयार केला जाणार आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास समितीकडून हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती अधिसुचना निर्गमीत करून शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम देण्याबाबत विमा कंपनीला सुचना दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता या सर्वेॅक्षणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 2.93 लाख शेतकऱ्यांनी दिली माहिती हिंगोली जिल्हयात 4.72 लाख शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासात विमा कंपनीला देणे आवश्‍यक आहे. त्यानुसार 2.93 लाख शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांकडून ऑफलाईन माहिती घेऊन विमा कंपनीनेच ऑनलाईन नोंद करण्याच्या सुचना कृषी विभागाने विमा कंपनीला दिल्या आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment