हिंगोलीत पोलिस अधिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद:305 गावांमध्ये एक गाव एक गणपती, जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापना

हिंगोलीत पोलिस अधिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद:305 गावांमध्ये एक गाव एक गणपती, जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापना

हिंगोली जिल्हयात जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याच्या पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला असून 305 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापना झाला आहे. तर जिल्हाभरात 1464 ्ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन झाल्या आहेत. या गणेश मंडळांकडून समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची तयारी चालविली आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभुमीवर एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले होते. या शिवाय अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी पोलिस ठाण्यांतर्गत घेतलेल्या बैठकीतही याबाबत आवाहन केले होते. जिल्हयातील 710 पैकी 305 गावांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे. यामध्ये औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 65 गावांमध्ये हि संकल्पना राबविण्यात आली असून कळमनुरी 27, सेनगाव 31, आखाडा बाळापूर 42, हट्टा 10, कुरुंदा 19, हिंगोली ग्रामीण 32, गोरेगाव 15, नर्सी नामदेव 14, बासंबा 26 तर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यांतर्गत 24 गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्हाभरात 262 गावांमध्ये हि संकल्पना राबविली होती. मात्र यावर्षी यामध्ये 43 गावांची भरपडली आहे. या शिवाय जिल्हाभरात एकूण 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. आता गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्हयात एक गाव एक गणपतीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण हलका झाला असून नुकसानग्रस्तांनाही मदत मिळणार असल्याने या गणेशमंडळांचे कौतूक केले जात आहे.

​हिंगोली जिल्हयात जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याच्या पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला असून 305 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापना झाला आहे. तर जिल्हाभरात 1464 ्ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन झाल्या आहेत. या गणेश मंडळांकडून समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची तयारी चालविली आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभुमीवर एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले होते. या शिवाय अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी पोलिस ठाण्यांतर्गत घेतलेल्या बैठकीतही याबाबत आवाहन केले होते. जिल्हयातील 710 पैकी 305 गावांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे. यामध्ये औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 65 गावांमध्ये हि संकल्पना राबविण्यात आली असून कळमनुरी 27, सेनगाव 31, आखाडा बाळापूर 42, हट्टा 10, कुरुंदा 19, हिंगोली ग्रामीण 32, गोरेगाव 15, नर्सी नामदेव 14, बासंबा 26 तर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यांतर्गत 24 गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्हाभरात 262 गावांमध्ये हि संकल्पना राबविली होती. मात्र यावर्षी यामध्ये 43 गावांची भरपडली आहे. या शिवाय जिल्हाभरात एकूण 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. आता गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्हयात एक गाव एक गणपतीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण हलका झाला असून नुकसानग्रस्तांनाही मदत मिळणार असल्याने या गणेशमंडळांचे कौतूक केले जात आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment