ऐतिहासिक महाकुंभ:जगातील सर्वात मोठ्या 45 दिवसीय सोहळ्याचे 66 काेटी लोक साक्षीदार, पुढील कुंभमेळा नाशिकला

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा बुधवारी समारोप झाला. या काळात ६६.३१ कोटी लोकांनी स्नान केले. शेवटच्या दिवशी दीड कोटी लोक आले. ही संख्या भारत-चीन वगळता उर्वरित सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ७३ देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह इटली, फ्रान्स, अमेरिकेचे भाविकही या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. आता प्रयागराज, अयोध्या, काशीसह १ डझन शहरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. पुढील कुंभ नाशिकला पुढील कुंभमेळा नाशिकला १७ जुलै २०२७ ला होणार आहे. दर १२ वर्षांनी नाशिक उज्जैनला कुंभमेळा होत असतो. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी प्रयागराजमध्ये ४५ कोटी लोक आल्यास उत्तर प्रदेशच्या जीडीपीमध्ये ३.५ लाख कोटींची भर पडेल असा अंदाज हाेता. प्रत्यक्षात ६६ कोटी लाेक पोहोचल्याने आता त्यात चार लाख कोटींची भर पडेल. सध्या उत्तर प्रदेशचा जीडीपी २५ लाख कोटी रुपये आहे. ४.५ लाख लोक २८०० विमानांनी आले. विक्रमी ७०० खासगी विमाने उतरली.
१५ काेटी लोक देशातून प्रयागराजला १३८३० रेल्वेने महाकुंभासाठी पाेहाेचले.
१० हजार नागा साधूंची पेशवाई निघाली. त्यांना सर्वात पहिले दर्शनाचा मान मिळाला. महाशिवरात्रीला काशी शहर भाविकांनी फुलले. दिवसात १५ लाख जणांनी बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले. हा महाशिवरात्रीचा उत्सव २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. गुरुवारी ४३ वर्षांच्या परंपरेनुसार शिव वरात काढण्यात येणार आहे.