IAS अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरूच:आता 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या, मध्य प्रदेशातील अंजली रमेश यांची हिंगोलीत बदली

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट अद्यापही सुरूच आहे. गेल्याच आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे नागपुरात बदली करण्यात आली असून त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे 2020 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांनी अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रास येथून बीटेक आणि एमटेक पूर्ण केले आहे. मध्य प्रदेश राज्यात त्यांनी उपविभागीय अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आता त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांची करण्यात आली बदली
मागील आठवड्यात या अधिकाऱ्यांची झाली होती बदली