‘आंबेडकर जिंदा है तो, गोडसे मुर्दा है’:पंतप्रधान मोदींच्या ‘एक है तो सेफ’ विधानावर MIM अध्यक्ष ओवैसींची टीका

‘आंबेडकर जिंदा है तो, गोडसे मुर्दा है’:पंतप्रधान मोदींच्या ‘एक है तो सेफ’ विधानावर MIM अध्यक्ष ओवैसींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या विधानावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘इंसाफ है तो इंडिया है, संविधान है तो सम्मान है, आंबेडकर है जिंदा है तो गोडसे मुर्दा है’, असे ओवैसी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना ओवेसी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचारसभेत ‘एक है तो सेफ है’ असा नारा देत आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात आयोजित एका सभेत ‘कटेंगे तो बटेंगे’ असे म्हणत सगळ्यांनी निवडणुकीत एकोपा दाखवावा, असे म्हटले होते. यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले ओवैसी?
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगर येथील आयोजित सभेत बोलताना म्हणाले की, “मजलिस म्हणत आहे की, ‘हम अनेक हैं तो अखंड हैं’. मोदींची एक करायची इच्छा आहे. आरएसएसची एक करण्याची इच्छा आहे. यावर मला मोदींना उत्तर द्यायचे आहे, ‘इंसाफ है तो इंडिया सेफ है’, ‘संविधान है तो सम्मान है’, ‘आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है’. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या मनाने माणणारे असतील, तर प्रेम आहे.” ओबीसी बांधवांनी मोदींच्या कटात अडकू नये
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले , ”पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय करत आहेत. तर मोदी एक काम करत आहेत, मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. मी ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की, तुम्ही मोदींच्या कटात अडकू नका. ते एक होण्यासंदर्भात बोलत आहेत आणि आम्ही अनेकांसंदर्भात बोलत आहोत. त्यांची एकीच्या नावावर सर्वांमध्ये भांडण लावण्याची इच्छा आहे.” काय म्हणाले होते मोदी?
आदिवासी जातींची एकजूट काँग्रेसला सहन होत नाही. अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपावी, असा काँग्रेसचा अजेंडा असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेसने धर्माच्या नावावर असाच कट रचला होता, तेव्हा देशाचे तुकडे झाले. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभे करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे ‘एक हैं तो सेफ हैं’. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे, असे मोदी म्हणाले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment