अनैतिक संबंधातून झालागोरठा शिवारातील खून:तपासात उघड; मारेकरी महिलेसह मुलाला बेड्या

गोरठा शिवारात झालेला खून अनैतिक संबंधांमुळे झाला, पुरावानष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला, असा खुलासा स्थानिकगुन्हा शाखेच्या पथकाने केला आहे.या घटनेतील मारेकरी महिला आणि तिच्या मुलाला पथकाने नांदेड शहरातून अटक केली आहे. उमरी तालुक्यातील मौजे गोरठा शिवारात एका २५ ते ३५वयोगटातील अज्ञात तरुणाचा खूनकरून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्याटाकीत टाकून जाळण्यात आलाहोता. ही घटना १२ मार्च रोजीसकाळी उघडकीस आली.याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यातखुनाचा गुन्हा दाखल करण्यातआला. मात्र, मृत आणि मारेकरीअज्ञात असल्यामुळे पोलिसांसमोरतपासाचे आव्हान निर्माण झालेहोते. उमरी पोलिस आणि स्थानिकगुन्हा शाखेच्या पथकाने यापरिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे,जिल्ह्यातील आणि शेजारीलराज्याच्या सीमेलगतच्या पोलिसठाण्यातील मिसिंग रेकॉर्डचीपडताळणी केली. दरम्यान, मृताचेवडील विठ्ठल माणिकराव शिंदे यांनीदिलेल्या तक्रारीत नांदेड शहरातीलगुरुद्वारा गेट नं. ३ येथील सुनीता कौररामसिंग बघेल हिचे मृत साईनाथयाच्याशी अनैतिक संबंध होते.त्यामुळे ती त्याला लग्न करण्याचातगादा लावत होती. यातून तिने व तिच्या मुलानेमारण्याची धमकी दिली आणिअखेरीस सुनीता कौर बघेल व जितूरामसिंग बघेल या दोघांनीसाईनाथचा खून करून त्याचामृतदेह गोरठा शिवारात जाळूनटाकला, असे तक्रारीत नमूद होते.पोलिस पथकाने या दोन्ही आरोपींनानांदेड शहरातून अटक केली.आरोपींनी साईनाथचा खूनकेल्याची कबुली दिली आहे. हातातील अंगठ्यांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी मृताचे जळालेल्याकपड्यांचे तुकडे, हातातील अंगठ्यायावरून ओळख पटवण्याचा प्रयत्नकेला. यात १५ मार्च रोजी मृत हामौजे असर्जन क्रांतीनगर, नांदेडयेथील वाहनचालक साईनाथ विठ्ठलशिंदे (२४) असल्याचे निष्पन्न झाले.