इम्पॅक्ट फीचर:कला शाखेतील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या महत्त्वाच्या 8 स्कॉलरशीप

सर्वाधिक सर्जनशील विषय आर्ट्स म्हणजेच कला शाखेत आहेत. या विषयांना सर्जनशील अभिव्यक्ती असून त्यात संगीत, नृत्य, पाककला, रंगकाम, अभिनय, साहित्य, इतिहास इत्यादींचा समावेश होतो. भारतातील विद्यार्थ्यांमध्ये कला शाखा लोकप्रिय होते आहे. ज्यांना सामाजिक उत्क्रांती आणि मानवी अनुभवांचे कंगोरे समजून करिअर घडवायचे आहेत, ही शाखा त्या विद्यार्थ्यांकरिता आहे. तरीच जेव्हा या विषयांचा अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा भारतातील सर्वात चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, अशा नामांकित कॉलेजमधून डिग्री घ्यायची तर इतर कॉलेजच्या तुलनेत त्यांची फीदेखील अधिक असते. जर तुम्ही निवडलेल्या कॉलेजची फी तुमच्या बजेटपेक्षा जास्त असेल, तर त्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमचे शिक्षण आणि भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क भरण्यासाठी आणि राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्याची खात्री करणे योग्य ठरते. यासाठी तुम्ही उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप)साठी अर्ज करण्याचा विचार करू शकता. हा ब्लॉग तुम्हाला कला विद्यार्थ्यांच्या 8 शिष्यवृत्तींबद्दल जाणून घेण्यास मदत करेल. या स्कॉलरशीपमधून तुम्हाला शिकवणी शुल्क (ट्यूशन फी) आणि राहण्याचा खर्च भागवण्यास मदत होईल. भारतातील कला विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 8 स्कॉलरशीप खाली दिल्या आहेत: 1. सरयू दोशी ग्रॅज्युएट फेलोशिप्स इन लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्या कला विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी यशस्वीरीत्या अर्ज केला, तर तुम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, यूके, जर्मनी इत्यादी देशांमध्ये स्थापन झालेल्या कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवू शकता. ही शिष्यवृत्ती निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण शुल्क भरण्यासाठी 4,078 डॉलर्सची रक्कम देते. 2. इनलॅक्स शिवदासानी स्कॉलरशीप ही शिष्यवृत्ती सर्जनशील प्रतिभा विकसित करण्याची इच्छा असणाऱ्या कला विद्यार्थ्यांसाठी आहे. एक स्वतंत्र फाउंडेशन समिती अर्जदारांचे विश्लेषण करून विद्यार्थी निवडते. ही निवड प्राथमिक मुलाखतीनंतर अंतीम मुलाखतीवर आधारित असते. तथापि, अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे स्वत:चे काम दर्शवणारा एक पोर्टफोलिओ असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीत निवडक विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, आरोग्य भत्ता, एकतर्फी प्रवास भत्ता आणि राहणीमानाचा खर्च समाविष्ट आहे. 3. फाइन आर्टसकरिता कृष्णक्रिती फाउंडेशन स्कॉलरशीप कृष्णक्रिती फाउंडेशन, फ्रेंच दूतावासाच्या भागीदारीत, ज्या विद्यार्थ्यांना फ्रेंच संस्थांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे आणि व्हिज्युअल किंवा ललित कलांमध्ये पदवी प्राप्त करायची आहे अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देते. उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. ही स्कॉलरशीप मासिक शिष्यवृत्ती, वैद्यकीय विमा आणि विमान तिकिटे उपलब्ध करून देते. या स्कॉलरशीपमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासह व्हिसा आणि कॅम्पस फी समाविष्ट आहे. 4. संस्कृती-कलाक्रिती फेलोशिप ही स्कॉलरशीप कला विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. ही संधी ज्यांना सध्याचे कला प्रकार विकसित करायचे आहेत अशा तरुण कलाकारांसाठी आहे. अर्जदारांना भारतीय शास्त्रीय नृत्याचा दहा वर्षांचा अनुभव आणि आपले पूर्वीचे काम दाखवणारा पोर्टफोलिओ असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे दोन संदर्भ पत्रे देखील असणे आवश्यक आहे. या स्कॉलरशीपकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन हप्त्यांमध्ये रु. 50,000 रुपये दिले जातील. 5. द युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थहॅम्प्टन – मास्टर्स स्कॉलरशीप्स या स्कॉलरशीपमुळे भारतीय कला विद्यार्थ्यांना विविध कला क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेता येते. विद्यार्थी नॉर्थहॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळाद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. तथापि, अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम समाविष्ट आहे. 6. आयईडी स्कॉलरशिप्स ही स्कॉलरशीप इटलीतील युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनद्वारे दिली जाते आणि विशेषतः बार्सिलोना, माद्रिद, फ्लॉरेन्स, रोम, व्हेनिस किंवा मिलान येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. या स्कॉलरशीपकरिता कला विद्यार्थ्यांच्या ट्यूशन फीच्या 50% समाविष्ट करते. 7. कल्चरल टॅलेंट सर्च स्कॉलरशीप स्कीम या शिष्यवृत्तीचा उद्देश कला विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक क्षेत्रात व्यापक प्रशिक्षण देण्याचा आहे. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रु. 3,600 प्रति वर्ष आणि ट्यूशन फीसाठी वार्षिक रु. 9,000 रुपये इतका खर्च देण्यात येतो. ही स्कॉलरशीप 10 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असून त्यासाठी मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत. 8. निरनिराळ्या सांस्कृतिक क्षेत्रांमधील तरुण कलाकारांसाठी स्कॉलरशीप स्कीम ही शिष्यवृत्ती भारतातील रंगमंच कला (थिएटर), दृश्य कला (व्हिज्यूअल आर्ट) आणि शास्त्रीय संगीत यासारख्या क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण घेतलेल्या कला विद्यार्थ्यांसाठी आहे. या स्कॉलरशीपमार्फत निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी दोन वर्षांसाठी वार्षिक रु. 5,000 देण्यात येतात. तथापि, निवड होण्यासाठी, विद्यार्थ्यांना मुलाखतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निष्कर्ष एक क्षेत्र म्हणून कला (आर्टस्) शाखेचा मार्ग हा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या करिअर मार्गांपैकी एक बनला आहे. तथापि, भारताबाहेर अशी अनेक महाविद्यालये आहेत जी प्रतिष्ठित मानली जातात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. भारतातील महाविद्यालयांच्या तुलनेत अशा बहुतेक महाविद्यालयांचे शुल्क अधिक असते. त्यामुळे भारतातील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी वरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. या स्कॉलरशीपकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करताना राहणीमान खर्च आणि ट्यूशन फी भरण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविण्यात मदत होऊ शकते. बहुतेक कला विद्यार्थी त्यांच्या online marketplace किंवा मंचांचा वापर करून NBFCsकडून शैक्षणिक कर्ज घेणे पसंत करतात. तथापि, एक कला विद्यार्थी म्हणून, तुम्ही विविध स्कॉलरशीपसाठी अर्ज करण्याचा विचार करू शकता. ज्यामुळे तुम्हाला विशिष्ट कला महाविद्यालयासाठी अंशत: किंवा संपूर्ण शुल्क भरता येईल.