झारखंडमध्ये PM मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड:दिल्लीहून दुसरे विमान पाठवले; राहुल गांधीही दीड तास विमानतळावर अडकून राहिले

झारखंडमधील देवघर येथे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुपारी 2.20 वाजल्यापासून ते येथे अडकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसाठी दिल्लीहून दुसरे विमान पाठवले आहे. पंतप्रधान विमानातच आहेत. एसपीजीने त्यांना एअरपोर्ट लाउंजमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाही. मोदी सकाळी याच विमानाने देवघरला आले. येथून ते बिहारमध्ये जमुई आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना देवघरहून दिल्लीला जायचे होते, पण विमान टेक ऑफ होऊ शकले नाही. दिल्लीहून विमान पाठवले जात आहे
विमानतळाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे विशेष विमान भारतीय हवाई दलाचे आहे. वरिष्ठ पायलटने तांत्रिक बिघाडाची माहिती देताच पीएमओने समन्वय साधला आणि हवाई दलाचे विमान दिल्लीहून देवघरला पाठवले. राहुल गांधींचे हेलिकॉप्टर गोड्डा येथे रोखले:45 मिनिटांनंतर उड्डाणाला परवानगी, काँग्रेसने म्हटले – हे मान्य नाही झारखंडमधील गोड्डा येथे निवडणूक सभेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर 45 मिनिटे रखडले होते, असे सांगण्यात येत आहे की गोड्डा येथील बेलबड्डा येथून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने हेलिकॉप्टरला उड्डाण करण्याची परवानगी दिली नाही. वाचा सविस्तर बातमी… या संबंधित ही पण बातमी वाचा… राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द:विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण; व्हिडिओद्वारे मागितली शेतकऱ्यांची माफी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्या नंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक व्हिडिओ संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तेथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि एका जाहीर सभेला संबोधित करायचे होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकलो नाही. मला माहित आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. पण मी तुम्हाला आश्वासित करतो की, आमचे सरकार आल्यानंतर सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल.’ वाचा सविस्तर बातमी…

Share