काँग्रेस नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ:कार्यालयात आढळलेल्या दोन संशयितांच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह चॅट; मुंबई पोलिस अलर्टवर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आल्याने पोलिस अलर्ट मोडवर आले असून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्या दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले, त्या दोन संशयतांच्या मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह चॅट देखील खान यांच्या संबंधित आढळून आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे. काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित व्यक्ती आढळले होते. या संशयित व्यक्तींच्या मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह चॅट आढळून आले आहेत. या चॅटमध्ये खान यांच्याशी संबंधित माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खान यांच्या घराबाहेर तसेच कार्यालयाजवळ स्थानिक पोलिस ठाण्यांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांना देखील पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला होता. तरी देखील त्यांची हत्या झाल्याने मुंबई पोलिस आता अलर्ट वर आली आहे. आता नसीम खान यांच्या देखील जीवाला देखील धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अमेरिकेतील अदानी प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली:मोदी काय प्रायश्चित्त घेणार आहेत? ठाकरे गटाचा निशाणा अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला. आपल्याकडचे स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे मात्र कायम अदानींना पाठीशी घालत आले. अदानी त्यांचे काय ते भोगतील. परंतु तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची? अमेरिकेतील प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे. अदानी यांची ‘सावली’ बनलेले पंतप्रधान मोदी त्याचे काय प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी सामनाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा….