भारतीय वाघिणी:कर्नल सोफिया यांनी वार्तालापानंतर भावाला विचारले – धमाका कसा वाटला, मिशन फत्ते!, एक युद्धाच्या स्थितीत शांततेसाठी माहिर, दुसरी ‘घातक उडणारी परी’
ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांची कथाही रोमांचक आहे. कर्नल सोफिया यांनी पत्रकार परिषदेनंतर बडोद्यातील भावाला फोन करून सांगितले, मिशन पूर्ण झाले, धमाका कसा वाटला? आई-वडील म्हणाले, मुलीने माता-बहिणींच्या सिंदूरचा बदला घेतला आम्हाला अभिमान आहे, मुलीने देशासाठी मोठे काम केले. पाकिस्तानला नष्ट करायला हवे. माझे आजोबा, वडील अन् मी सैन्यात होतो. आता मुलगी सैन्यात आहे. -ताज मोहंमद कुरेशी, कर्नल सोफियाचे वडील मुलीने बहिणी आणि मातांच्या सिंदूरचा (कुंकवाचा) बदला घेतला. सोफिया पिता आणि आजोबांच्या पावलावर चालते. सोफिया लहानपणी म्हणायची, मी सैन्यातच जाणार. -हलिमा कुरेशी, कर्नल सोफिया यांची माता कर्नल सोफिया कुरेशी… आजोबा, वडील, पती सर्वच सैन्यात काश्मीर, अरुणाचलमध्ये कठीण हवाई मोहिमांमध्ये कामगिरी फत्ते