चष्मा विदेशी असेल तर संविधानात भारतीयत्व कधी दिसणार नाही-शहा:गृहमंत्री शाहांचा आरोप – काँग्रेसने सत्तेसाठी घटनादुरुस्त्या केल्या

“भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेत विरोधकांनी मंगळवारी भाजपवर राज्यघटना बदलण्याचा कट रचल्याचा आरोप केला, तर गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. राज्यघटनेला वैयक्तिक संपत्ती मानून संसदेचा विश्वासघात केला. चष्मा विदेशी असेल तर संविधानात भारतीयत्व कधीच दिसणार नाही, असे शाह या वेळी म्हणाले. नेहरूंनी ‘भारत’ या नावाला विरोध केला. जर तुम्ही इंडियाच्या चष्म्यातून ‘भारत’ पाहिला तर तुम्हाला ‘भारत’ कधीच समजणार नाही. शाह म्हणाले की, आमच्या सरकारने केलेल्या घटनादुरुस्त्या लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि ज्यांना अधिकार नाहीत त्यांना समान अधिकार देण्यासाठी होत्या आणि काँग्रेसच्या काळात सत्ता टिकवण्यासाठी या दुरुस्त्या केल्या. शाह म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ ६ वर्षांनी वाढवण्याचे निर्लज्ज कृत्य काँग्रेसशिवाय जगात कुणीही केलेले नाही. वीर सावरकरांचा उल्लेख करत शाह यांनी राहुल गांधींवर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. अनेक हुकूमशहांचा अहंकार लाेकशाहीने चिरडला : शाह शाह म्हणाले की, आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोल आहेत. त्यामुळे अनेक हुकूमशहांच्या अहंकाराचा आणि अभिमानाचा चक्काचूर झाला आहे. भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही, असे म्हणणारे खोटे ठरले. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १०० वर्षे तुम्ही जिंकाल, तरी नेहरू तिथेच उभे दिसतील : झा पंडित नेहरू यांचा संदर्भ देत राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोजकुमार झा यांनी भाजपवर टीका केली. झा म्हणाले की २०१४, २०१९ आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू हरले नाहीत, परंतु विरोधक आणि काँग्रेसचा पराभव झाला. तुम्ही (भाजप) पुढील १०० वर्षे निवडणुका जिंकू शकाल, परंतु तुम्ही नेहरूंना (तेव्हाही) तिथे उभे असलेले पाहाल. कारण ते हुकूमशाहीच्या विरोधात संसदीय लोकशाहीचे प्रतीक आहेत. इथे नेहरू, इंदिरा, राजीव गांधी आणि मनमोहन यांना बरे-वाईट म्हटले : राजीव शुक्ला राज्यसभेत काँग्रेसच्या वतीने झालेल्या चर्चेत भाग घेत राजीव शुक्ला म्हणाले की, संविधानावर चर्चा होईल असा त्यांचा विचार होता. पण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांना दोन्ही सभागृहात बरे-वाईट म्हटले जात असल्याचे मला दिसते. ही चर्चा राज्यघटनेवर अजिबात नाही असे दिसते..फक्त आरोप-प्रत्यारोप आहेत. आज काय होणार आहे, भविष्यात काय व्हायला हवे, यावर चर्चा होत नाही. शुक्ला यांनी विचारले की नेहरूंपासून वाजपेयींपर्यंत कुणीही काम केले नाही का?

Share