इंद्रजीत सावंतांना मीच फोन केला:मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला, प्रशांत कोरटकरने पोलिसांकडे कबुली दिल्याची माहिती

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. दरम्यान प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार होतो असेही पोलिसांना सांगितले आहे. कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याच्या आवाजाची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकरने कोल्हापूर पोलिसांना ही माहिती दिल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू प्रशांत कोरटकर हा तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर याची चौकशी केली जात आहे. प्रशांत कोरटकर कुठे गेला होता, कोणाची मदत घेतली, कुठे किती दिवस राहिला, यादरम्यान कोणीकोणी मदत केली, असे प्रश्न पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला विचारले. त्यामुळे त्याला पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी मदत केली का देखील तपासले जात आहे. 3 दिवसांची पोलिस कोठडी आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी वकीलांनी केली होती. यातून पोलिस कोठडी देताच कोरटकरने कबुली दिली आहे. कोरटकरवर बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती होईल – मुख्यमंत्री कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलिस करतील असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हेच पोलिसांनी दाखवून दिलेले आहे. बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.