इंग्रजीच्या पेपरचा फोटो व्हायरल प्रकरण:5 जणांना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी

इंग्रजीच्या पेपरचा फोटो व्हायरल प्रकरण:5 जणांना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी

इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रातून मोबाइलवर फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरजवळच्या बारव्हा येथील एका केंद्रावर घडला. सुदैवाने पेपर व्हायरल झाला नाही. या प्रकरणात लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्या तक्रारीवरून तिघा जणांविरोधात दिघोरी मोठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासकार्य आरंभिले असता आणखी दोघांना अटक केली असल्याने ५ जणांना अटक झाली असून संबंधितांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती देण्यात आली आहे. विशाल बाबुराव फुले (४१), दिपक दयाराम मेश्राम (३५) रा मानेगाव , मयूर कृष्णकुमार टेंभरे (३५) रा. विजय नगर गोंदिया, राकेश केशोराव बिसेन (३५) रा गोंदिया, सुरेंद्रकुमार शरद पटले (४५) रा कुडवा गोंदिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर असे की, १ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. सकाळी ११ वाजता हा पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर ११:३० वाजताच्या सुमारास संबंधित केंद्रातील एक कर्मचारी पेपरचे फोटो काढताना आढळला. ही माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्या भागातील भरारी पथकाला माहिती देण्यात आली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक १० मिनिटांत बारव्हा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय चिचाळ जैतपुर व जिल्हा परीषद हायस्कुल येथील केंद्रावर पोहोचले. हा प्रकार खरा असल्याचे पथकाच्या लक्षात आले. झालेल्या प्रकाराची गंभीर्यता लक्षात घेता लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दिघोरी मोठी पोलिसात गुन्हा दाखल केला. दिघोरी मोठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासकार्य आरंभीत ५ जणांना अटक केली आहे. या पाचही आरोपींना २ मार्च रोजी लाखांदूर येथील कनिष्ठ न्यायालयात हजर केले असता लाखांदूर न्यायालयाने ५ मार्च पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून याप्रकरणी आणखी आरोपींची वाढ होते काय ? व आरोपींवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार करीत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment