IPLमध्ये आज RR vs KKR:कोलकाताने टॉस जिंकून घेतली बॉलिंग; सुनील नरेनच्या जागी मोईन अली खेळणार

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या सहाव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स (आरआर) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध सामना करणार आहे. हा सामना राजस्थानच्या दुसऱ्या होम ग्राउंड गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. कोलकाताला त्यांच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आणि राजस्थानला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. प्लेइंग-११ राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा. कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण वक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा.