इस्रायली पर्यटकासह 2 महिलांवर अत्याचार:एकास कालव्यात फेकले, हम्पीतील घटना, मृत तरुण ओडिशाचा

कर्नाटकमधील हम्पी येथील सनापूर सरोवराच्या किनारी २७ वर्षीय इस्रायल पर्यटकासह दोन महिलांवर कथित सामूहिक अत्याचाराचे प्रकरण उजेडात आले आहे. महिलांना मारहाणही झाली. शनिवारी पोलिस म्हणाले, आरोपींनी महिलांसह सोबतच्या तीन पुरुष पर्यटकांवरही हल्ला केला आणि त्यांना कालव्यात ढकलून दिले. त्यापैकी दोन पर्यटक पोहून बाहेर पडू शकले. एक ओडिशातील पर्यटक असून त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यात आला. अत्याचाराची घटना ६ मार्चच्या रात्री सुमारे ११ च्या सुमारास घडली. रात्री भोजनानंतर २९ वर्षीय होमस्टे संचालक, इस्रायली तरुणी व तीन पुरुष पर्यटक तुंगभद्रा कालव्याच्या किनारी गिटारवादन करत होते. पुरुष पर्यटकांमध्ये अमेरिकेतील डॅनियल पिटास (२३) व नाशिकचे पंकज पाटील (४२) व ओडिशाचे बिभाष (२६) होते. होम स्टे संचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही पाच जण हम्पीजवळील सानापूरच्या दुर्गम्मा मंदिराहून येताना कालव्याजवळ बसलो होतो. तेव्हा तीन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी पेट्रोल कुठे मिळेल, असे विचारले. १०० रुपये मागितले. आम्ही पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा दबाव आणला. त्यावर विभाषने २० रुपये दिले. तरीही आरोपींनी भांडण केले. हल्ला केला. वाद वाढल्यावर आरोपींनी तीन पुरुषांना कालव्यात ढकलले. दोन अटकेत… मिस्त्री काम करतात दोघे