जळगावात चांदीत किलोमागे 1 हजाराची वाढ; 99,000 वर:देशभरात सरासरी 1,474 वाढ, तीन महिन्यांत 15 टक्के परतावा

जळगावात चांदीत किलोमागे 1 हजाराची वाढ; 99,000 वर:देशभरात सरासरी 1,474 वाढ, तीन महिन्यांत 15 टक्के परतावा

जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी चांदीचा भाव १,००० रुपयांनी वाढून ९९,००० रुपये (जीएसटी शिवाय) प्रतिकिलो झाला. ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या १,००,००० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आता ते फक्त १००० रुपये कमी आहे. तर देशात चांदी १,४७४ रुपयांनी वाढून ९८,१०० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली. २३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या ९८,८६२ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आता फक्त ७६२ रुपये कमी आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) आकडेवारीनुसार,चांदीने २०२५ मध्ये आतापर्यंत १४% आणि गेल्या तीन महिन्यांत १५% पर्यंत परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात चांदीत ३५.२% वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, चांदीतील तेजी सुरूच राहणार आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस ३८ डॉलर आणि देशांतर्गत बाजारात १ लाख ३० हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकते. सोन्यापेक्षा चांदी अजूनही स्वस्त आहे. सोने-चांदीचे गुणोत्तर प्रमाण (गोल्ड-सिल्व्हर रेश्यो) ९० च्या खाली ट्रेड करत आहे. जेव्हा तो ९० च्या आसपास असतो तेव्हा असे म्हटले जाते की चांदी सोन्यापेक्षा स्वस्त आहे. गेल्या ५० वर्षांत, तो कधीही ९० च्या पातळीपेक्षा वर जास्त काळ राहू शकला नाही. कोविड काळात सोने-चांदीचे गुणोत्तर प्रमाण १२८ पर्यंत वाढले होते आणि २०११ मध्ये ते ३२ पर्यंत कमी झाले होते. मागणी वाढत असताना चांदीचे उत्पादन चौथ्या वर्षी घटले
हे चौथे वर्ष आहे, जेव्हा चांदीचे उत्पादन घटले आहे आणि दुसरीकडे वाढत्या औद्योगिक वापरामुळे त्याची मागणी वाढत आहे. पूर्वी चांदी फक्त फोटोवोल्टिकध्ये वापरली जात असे. परंतु गेल्या १० वर्षांत स्वच्छ ऊर्जा, हरित ऊर्जा आणि ५जी इत्यादी उद्योगांमध्ये चांदीचा वापर वाढला आहे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर लोक शेअर्समधून पैसे काढून सोने आणि चांदीत गुंतवत आहे. रशियन सेंट्रल बँकेने म्हटले आहे की ते चांदीचा साठा वाढवण्याचा विचार करू शकतात.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment