जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू:भोकरदन शहरासह तालुक्यातील 16 गावातील 188 हेक्टर जमीन होणार अधिग्रहीत
![जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू:भोकरदन शहरासह तालुक्यातील 16 गावातील 188 हेक्टर जमीन होणार अधिग्रहीत](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/29/whatsapp-image-2025-01-29-at-103420-pm_1738170445.jpeg)
जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू झाली आहे. भोकरदन शहरासह तालुक्यातील सोळा गावातून जाणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत कारवाई सुरू झाली आहे सोळा गावच्या ज्या गटातून रेल्वे मार्ग जाणार आहे त्या गटाच्या जमिनीच्या अभिलेखांमध्ये कुठलाही बदल करू नये यासाठी दुय्यम निबंधक यांनाही पत्र देऊन ते गट नंबर ब्लॉक करण्यात आले आहे अधिग्रहणाची कारवाई सुरू झाल्याची माहिती भोकरदन चे उपविभागीय अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप यांनी दिली आहे. माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून हा जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज लाईन चा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता त्यांच्या कार्यकाळातच या मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम हे सुरू झाले होते या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे हा रेल्वे मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होईल असे दिसत आहे. जालना जळगाव नवीन ब्रॉडगेज लाईन रेल्वे मार्गासाठी अधिक जमीन अधिग्रहणाची कारवाई करावी यासाठी सेंट्रल रेल्वे भुसावळ च्या डेप्युटी चीफ इंजिनियर किशोर सिंग यांचे 16 जानेवारी चे पत्र भोकरदन च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे त्यात प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची यादीही देण्यात आलेली आहे त्यानुसार अधिग्रहणाची पुढील कार्यवाही करावी यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास पत्र दिले आहे त्यानुसार अधिग्रहणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जालना जळगाव या 174 किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने भोकरदन शहरासह तालुक्यातील सोळा गावात गावनिहाय जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्यात आली आहे भोकरदन गारखेडा बेलोरा शिरसागर नांजा सोयगाव देवी तपोवन वालसा खालसा चांदई ठोंबरी देऊळगाव ताड बोरगाव तारू मुथाड राजुर चांदई टेपली चिंचोली जोमाळा या 16 गावातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. भूसंपादनाच्या बाबत कारवाई साठी दुय्यन निबंध कार्यालयाला उपविभागी अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप यांनी पत्र दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की जालना ते जळगाव दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्ग बांधकामासाठी रेल्वे सुधारणा अधिनियमानुसार प्रस्ताव कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी नमूद केली आहे सदर प्रकरणातील पत्रात नमूद केल्याप्रमाणे सदरील 16 गावातून हे रेल्वे प्रकल्पाच्या ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी जमीन संपादित करावयाची असल्याने त्या सदर गावामध्ये कोणत्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जमीन हस्तांतरण करण्यात येऊ नये सदरील गट हे आज पासूनच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या गटाच्या जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या क्षेत्रामध्ये बदल करण्यात येऊ नये तसेच सदरील गट आजपासून ब्लॉक करण्यात यावे जे गट ब्लॉक करण्यात येणार आहे त्याची यादीही उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालयाला दिली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप म्हणाले, जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन जालना यांचे कारवाई संबंधीचे पत्र भोकरदनच्या उपविभागाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे त्याचप्रमाणे रेल्वे बोर्डाने ही 174 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्या अनुषंगाने सदर प्रकरणात गावनिहाय जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून सदरील गटांच्या जमिनीमध्ये कुठलीही व्यवहार करण्यात येऊ नये यासाठी सूचना पत्र दुय्यम निबंध कार्यालयाशी देण्यात आले आहे . माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा “जालना जळगाव रेल्वे मार्ग” ,हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या कामाला मोठी चालना मिळाली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जालना जळगाव या नवीन रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली व आता प्रत्यक्ष रेल्वे मार्गासाठी कार्यवाही सुरू झाली आहे.