जपानला मागे टाकून भारत जगात चौथी मोठी अर्थव्यवस्था:नीती आयाेगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांची माहिती

जपानला मागे टाकून भारताने जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा दाखला देत ते म्हणाले, “फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठ्या आहेत. जर आपण नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेलो, तर २.५ ते ३ वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार २०२५ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ३४८.७७ लाख कोटी रुपये (४.१९ ट्रिलीयन यूएस डाॅलर्स) एवढी होण्याची अपेक्षा आहे, जी जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. नाणेनिधीच्या अंदाजानुसार, भारताचा जीडीपी २०२५ मध्ये ३४७.५२ लाख कोटी रुपये (४.१८७ ट्रिलियन डाॅलर्स) एवढे असेल, जे जपानच्या अंदाजित जीडीपीपेक्षा थोडे अधिक आहे. नाणेनिधीच्या अहवालानुसार, २०२५-२६ आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.२ टक्के राहील. जागतिक अनिश्चितता आणि व्यापारयुद्धामुळे पूर्वीच्या ६.५ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा ही वाढ कमी असेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment