न्यायालयाचा इशारा:सावरकरांवर राहुल गांधी ‘बरळल्यास’ आता सुप्रीम कोर्ट स्वत: कारवाई करेल, इतिहास जाणून न घेता वक्तव्य करू नका

वि.दा. सावरकर हे इंग्रजांचे सहकारी होते आणि त्यांना इंग्रजांकडून निवृत्तिवेतन मिळत होते या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे आेढले. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मनमोहन यांचे पीठ म्हणाले, सावरकर यांच्या विरोधातील राहुल गांधी यांचे वक्तव्य ‘बेजबाबदारपणाचे’ होते. आता त्यांनी असे वक्तव्य पुन्हा केल्यास न्यायालय स्वत: दखल घेत कारवाई करेल. पण त्याचबरोबर वादग्रस्त विधानाच्या फौजदारी प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी पाठवलेले समन्स काेर्टाने स्थगित केले. राहुल यांच्याविरोधात वैमनस्य पसरवणे आणि सार्वजनिक गैरप्रकारांना प्रोत्साहन देण्याचे आरोप लावले गेले नाहीत, असे युक्तिवादात सिंघवी यांनी म्हटले, तेव्हा खंडपीठाने टिप्पणी केली की, “तुम्ही सर्वात आज्ञाधारक आहात.. तुमच्या अशिलाला माहीत आहे का की महात्मा गांधींनी व्हाइसरॉयला संबोधित करताना तुमचा विश्वासू सेवक, असा उल्लेख केला होता? व्हाइसरॉय यांना तुमचा सेवक म्हणून संबोधले म्हणून त्यांना ब्रिटिशांचे सेवक म्हणता येईल का? तुमच्या आजींनीही (इंदिरा गांधी) सावरकर यांची स्तुती केली होती, हे त्यांना ठाऊक आहे का? त्या काळात, मी पाहिले आहे की, कलकत्ता उच्च न्यायालयाचे आमचे न्यायाधीशही मुख्य न्यायाधीशांना तुमचा सेवक, असेच लिहिताना संबोधत होते. सुप्रीम कोर्ट राहुल गांधींना म्हणाले… महाराष्ट्रात सावरकर पूजनीय म. गांधींनी स्वत:ला व्हाइसरॉयचा विश्वासू सेवक म्हटले होते? मग त्यांना ब्रिटिशांचे सेवक म्हणता येईल का? इंदिरा गांधींनी सावरकरांचे कौतुक केले होते, हे कसे विसरला? कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्तीही सरन्यायाधीशांना तुमचा सेवक म्हणून उल्लेख करत. नॅशनल हेराल्ड केस; राहुल – सोनियांना नोटीस बजावण्यास न्यायालयाचा नकार नवी दिल्ली | नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने साेनिया गांधी व राहुल गांधी यांना आता नोटीस बजावण्यास नकार दिला. ईडीने कोर्टास सांगितले होते की, कायद्यानुसार आरोपींना ऐकल्याविना तक्रारीवर कारवाई केली जाऊ शकत नाही. कोर्ट म्हणाले, आरोपपत्रात काही आवश्यक कागदपत्रे नाहीत. आधी ती दाखल केली जावीत. त्यानंतर नोटीस पाठवायची की नाही यावर निर्णय घेऊ. पुढील सुनावणी २ मे रोजी होईल. स्वातंत्र्ययोद्ध्यांचा इतिहास-भूगोल न जाणता विधाने करू नये सुप्रीम काेर्टात हा खटला सुरू असताना “भारताच्या इतिहासाबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांविषयी असे बोलू नये. अशी कोणतीही टिप्पणी करू नये,” असे खंडपीठाने खडसावले. न्यायमूर्ती दत्ता पुढे म्हणाले, “राहुल एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रात जाता तेव्हा अशी टिप्पणी का करता, त्यांची (सावरकरांची) तिथे पूजा केली जाते. त्यामुळे अशी विधाने करू नये, जर केलीच तर आम्ही स्वत:हून त्याची दखल घेऊ, त्यामुळे असे करू नका.”
प्रकरण असे; भारत जोडो यात्रेवेळी केलेल्या विधानांविरुद्धची तक्रार राहुल गांधींवर आयपीएसचे कलम १५२ ए (शत्रुत्व वाढवणे) व ५०५ (सार्वजनिक खोडसाळपणा) अंतर्गत आरोप आहेत. सरकारी वकील नृपेंद्र पांडे यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवर तक्रार दाखल केली होती. अलाहाबाद हायकोर्टाने सावरकरांविरुद्ध विधान प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी दिलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्यास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्ट- तुमच्या आजींनीही (इंदिरा गांधी) सावरकरांची केली होती स्तुती