काकांचे बोट धरुन राजकारणात आले:बहिणीकडून पराभव, आता भाजपच्या मतदारसंघावर ताबा; जाणून घ्या धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय मुंडे आपल्या काकाचे बोट धरून राजकारणात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. भाजपचे दिवंगत नेते धनंजय मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर पंकजा मुंडे त्यांच्या चुलत भगिनी आहेत. धनंजय मुंडे काका गोपीनाथ मुंडे यांचा हात धरून राजकारणात आले. 2009 मध्ये त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने धनंजय मुंडे यांच्या मनात रोष होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपला राम राम करत आणि आपल्या काकांचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवत काका गोपीनाथ मुंडे यांची सत्ता संपवली. भाजपचा विजय रथ रोखला परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. भाजप येथे सातत्याने विजयी होत राहिला. धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये भाजपची विजयाची घोडदौड रोखली. धनंजय मुंडे यांचा अल्प परिचय धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे एका वंजारी कुटुंबात झाला. मुंडे यांच्या आईचे नाव रुक्मिणी मुंडे आहे. धनंजय मुंडे यांचा विवाह राजश्री मुंडे यांच्याशी झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण परळी आणि बीड येथे झाले. त्यांनी पुढील शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून घेतले आहे. 1995 मध्ये भाजपमधून राजकारणाला सुरुवात धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपमधून केली. भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी आपला राजकीय वारसा मुलगी पंकजाकडे सोपवला. भाजपने त्यांना परळीतून विधानसभेचे तिकीटही दिले आणि 2009 मध्ये त्या आमदारही झाल्या. 2014 मध्ये पराभवानंतर विधान परिषदेवर
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या लढत झाली. यावेळीही पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचा पराभव झाला. विधानसभेतील पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवले होते. त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. 2019 मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या विरोधात संधी दिली. यावेळी त्यांनी पंकज यांचा 30 हजार मतांनी पराभव करून 2014 च्या पराभवाचा बदला घेतला. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांना दिली साथ
2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली. त्यांनी शरद पवार यांना सोडून भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना कृषीमंत्रीपद देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत बहिणीचा प्रचार
धनंजय मुंडे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांच्याशी असलेले मतभेद मिटवले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार आणि बहीण पंकजासाठी बीड लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी प्रचार केला. पण पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत. तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने बलात्काराचे आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचे रेणू शर्मा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. बलात्कारासारख्या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली होती. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला होता.