कंचनपूर येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा:३० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी | अकोला कंचनपूर येथील जिल्हा परिषद माजी विद्यार्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला. शाळेत सन १९९०ते ९५ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. मेळाव्यात िवद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे तत्कालीन शिक्षक अब्दुल गनी पांडे, ज्ञानेश्वर मांडेकर, सुभाष फुकट, विजय देशमुख, दिगंबर अटकर, प्रताप वानखडे व आज रोजी कार्यरत असलेले शरद शेगोकार आमंत्रित करण्यात केले. त्यांना व्यासपीठावर विराजमान करण्यात आले. गावातील शिक्षण प्रेमी बळीराम चोरे, अनेक प्रतिष्ठित नागरीक, माजी विद्यार्थी, सासुरवासिणी माहेरात शिक्षणासाठी आल्याने विद्यार्थानीच्या आई-वडीलांनाचा वेगळाच आनंद झाल्याचे दिसून आले. शाळेतील माजी िवद्यार्थी- विद्यार्थिनी अनेक वर्षांनी शिक्षण घेतलेल्या वर्ग खोलीत आल्या. त्यामुळे भूतकाळात आठवणीला उजाळा मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर डिक्कर यांनी केले. प्रास्ताविक प्रतीक्षा पागृत िहने केले. जि.प. शाळेमुळे सर्व विद्यार्थी घडले अॅड. कैलास अनमाने , सीआरपीएफमध्ये असलेले नितीन ठाकरे, पोलीस पाटील विठ्ठल शेळके यांनी शालेय जीवनातील संस्कारामुळे आम्ही आमच्या क्षेत्रात अग्रेसर आहोत, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. माजी शिक्षक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी िवद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवू शकलो, हे श्रेय जि प . शाळेला असल्याचे मत व्यक्त केले.