काँग्रेसच्या शहर अध्यक्षांच्या घरावर गोळीबार:परिसरात तणाव, चंद्रपूरच्या घुग्घुस शहरातील घटना

काँग्रेसच्या शहर अध्यक्षांच्या घरावर गोळीबार:परिसरात तणाव, चंद्रपूरच्या घुग्घुस शहरातील घटना

चंद्रपूरमध्ये काँग्रेस शराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान दोन जणांनी घरावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. मात्र, गोळीबार करण्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान घुग्घुस शहरात काँग्रेस शहराध्यक्ष राजु रेड्डी यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटळास्थळी जात पुढील कारवाई सुरू केली आहे. हल्ला झाला त्यावेळी रेड्डी घरी उपस्थित होते. गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅलरीत सापडले काडतूस पोलिसांना रेड्डी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गोळीबारात वापरलेले काडतूस आढळून आले आहे.या भ्याड हल्ल्याची माहिती घुग्घुस मध्ये पसरताच राजु रेड्डी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर जमली, ज्यामुळे वातावरण आणखी तापले. पोलिसांनी रेड्डी यांच्या घरा सभोवती तगडा पोलीस बंदोबस्त त्याला तैनात केला आहे. हा हल्ला एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे रेड्डी यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू चंद्रपूर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी शहरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले जात असून या घटनेमागे राजकीय की व्यावसायिक वाद आहे याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. मात्र यातील आरोपीला शोधून काढणे हे पोलिसांपुढचे आव्हान असणार आहे. नागरिकांना अफवांवर लक्ष देवू नये, पोलिस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कायद्याचा धाक राहिला नाही- छगन भुजबळ राज्यात घडणाऱ्या विविध घटनांतून दिवसेंदिवस क्रौर्य वाढत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. लोक बेधडकपणे गुन्हे करत आहेत. हे धैर्य येते कुठून? गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाजाने एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment