कार्यशाळा:डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटवर कार्यशाळा संपन्न, यश कंकाळ यांनी केले मार्गदर्शन

कार्यशाळा:डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटवर कार्यशाळा संपन्न, यश कंकाळ यांनी केले मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर एक कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जे हेरोडे यांच्या मार्गदर्शनात आयक्यूएसी उपक्रमाअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. आयआयएम बोधगया येथील यश कंकाळ यांनी या एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते आयआयएम बोधगया येथे एकात्मिक व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे पदवीधर व सरगम ईआयचे संस्थापक आहे. सरगम ईआय हे विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्तेद्वारे सक्षम करण्याचे काम करते. सजगता म्हणजे केवळ विश्रांती नाही. ती जागरुकता व निवडीचा भाग आहे. संघर्ष आणि वाटाघाटींमधअये जो स्वतःला जाणतो तोच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान ठरतो असे कंकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी चर्चासत्र, वास्तववादी उदाहरणे व संवादात्मक उपक्रमांचा अनुभव घेतला. कार्यशाळेनंतर घेतलेल्या प्रतिसाद सर्व्हेक्षणात 86.1 टक्के विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकल्याचे सांगितले. तर 97 टक्के विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भावनिक बुद्धिमत्ता असणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मत प्राचार्य डॉ. पी. जे. हेरोडे यांनी व्यक्त केले. प्रा. किरण भालेराव, प्रा. संदीप पटेकर, प्रा. स्वप्नील चक्रे, प्रा. डॉ. शेख महेमूद आणि श्री प्रदीप साळवे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment