केजरीवाल यांची राजीनाम्याची घाेषणा:2 दिवसांत नवा सीएम; म्हणाले, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासोबतच निवडणूक घ्यावी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगून सर्वांनाच धक्का दिला. दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल रविवारी आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात बोलत होते. ते म्हणाले, दोन दिवसांत आमदारांच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड केली जाईल. मला जनतेच्या दरबारात अग्निपरीक्षा देण्याची इच्छा आहे. जनतेला आम्हाला प्रामाणिक जाहीर केल्यानंतरच खुर्चीवर बसेल. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तूर्त पदाची सूत्रे घेणार नाहीत. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी केली. वास्तविक दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणूक होईल. गैरभाजप सीएमला माझे आवाहन आहे. पीएमनी खोट्या खटल्यात तुरुंगात डांबल्यास राजीनामा देऊ नका. राज्यघटना सर्वोच्च आहे. भाजपने केजरीवाल यांच्या घोषणेला नाटक संबोधले. प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी म्हणाले, त्यांचे हे इमोशनल कार्ड आहे. राजीनाम्यातून त्यांनी घोटाळ्यातील भूमिका मान्य केली. सीएम पदाच्या दावेदारांत गोपाल राय, आतिशी, सौरभ यांची नावे अरविंद केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता नवीन नावाच्या चर्चेस सुरुवात झाली. गोपाल राय शर्यतीत आघाडीवर आहेत. ते २०१३ पासून मंत्री आहेत. मंत्रिमंडळात १४ मंत्रालये सांभाळणाऱ्या आतिशी सिंह यांचे नावही चर्चेत आहे. सौरभ भारद्वाज, कैलास गेहलोतही शर्यतीत मानले जातात. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांचे नावही समोर आले आहे. परंतु आमदारालाच सीएम पदासाठी निवडले जाणार आहे. राजीनामा का… जामिनाच्या कडक अटी, नव्या जनादेशासाठी डाव जामीनाच्या अटींनुसार केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत. नायब राज्यपाल अंतिम मंजुरी देतील अशाच विषयांच्या फाइलवर स्वाक्षरी करू शकतात. पक्षाच्या प्रमुख योजनांना राबवण्यात अडचणी येतील. कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे व जनादेश मिळवण्यासाठी हा डाव खेळला आहे.
पुढे काय… कारण सांगावे लागेल, पण अंतिम निर्णय आयोगाचाच
जाणकारांच्या म्हणण्यानुसार दिल्ली सरकारला लवकर निवडणूक घेण्यासाठी योग्य कारण सांगून तसे आयोगाला कळवावे लागेल. आयोग महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये निर्णय करू शकतो. परंतु जानेवारीत दिल्लीत मतदार यादी अपडेट होईल. म्हणून आयोग नियोजित वेळेतच निवडणूक घेऊ शकते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment