खात्यांचा सौदा, 20 हजार घेऊन दलालाने दिले 3 एटीएम कार्ड:राजस्थान, मप्र, छत्तीसगडच्या टोळ्यांपर्यंत पोहोचला ‘भास्कर’

सायबर फ्रॉडसाठी बँक खाते खरेदी करण्याचे अथवा बँक अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून बोगस खाते उघडण्याची काही प्रकरणे अलीकडे चव्हाट्यावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना चुकवून बँक कर्मचाऱ्यांकडून खात्यांची खरेदी करणे कितपत सोपे आहे याची पडताळणी ‘भास्कर’ने केली. त्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ‘भास्कर’च्या बातमीदारांनी स्वत:च नवशिके भामटे अथवा मध्यस्थ असल्याची बतावणी करून या नेटवर्कचा पर्दाफाश केला. सायबर फसवणूक करण्यासाठी फक्त १२-१५ हजार रुपयांत बँक खाते विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव प्रत्ययास आले.
राजस्थान : बातमीदाराला सिम देऊन दलाल म्हणाला.. हे खाते यूपीआयशी लिंक आहे, तुम्ही म्हणाल तेवढी खाती देऊ डीगच्या शुकशुकाट असलेल्या भागात बँक खात्याचा दलाल भेटला. त्याने ३ एटीएम कार्ड व लिंक सिमकार्ड दिले. डीगहून रंजन ठाकूर, श्रीगंगानगरहून मांगीलाल, हनुमानगडहून विशू वाट्स, इंदूरहून विकल्प मेहता, शिवपुरीहून दशरथ परिहार, रायपूरहून परमेश्वर डडसेनाचे वार्तांकन. डीग जिल्ह्यातील कनवरी गावात अर्जुन नामक एक तरुण बँक खात्यांची दलाली करीत असल्याची माहिती मिळाली. संपर्क केला असता त्याने ३ एटीएम कार्ड आणि सिमकार्ड आणून दिले. हे आधीपासूनच फोन पेशी लिंक आहे कितीही पैसे यात टाका अडथळे येणार नाहीत,असेही सांगितले. त्याने तीन खात्यांसाठी ४५ हजार रुपये मागितले. परंतु २० हजार रुपये घेऊन उर्वरित पैसे त्याचा म्होरक्या साहिलला देणार असल्याचे सांगितल्यावर तो तयार झाला. त्याने पाहिजे तेवढी खाती देण्याचीही तयारी दर्शवली. या प्रकरणी महानिरीक्षक (भरतपूर परिक्षेत्र) राहुल प्रकाश म्हणाले, ऑपरेशन अँटी व्हायरसअंतर्गत डीग येथून सायबर गुन्हेगारीमध्ये ११ महिन्यात ७१% घट झाली आहे. बँक खात्यांच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणांविरोधात कारवाई सुरू आहे. श्री गंगानगरमध्ये खाते खरेदी करण्याचेही उद्योग सुरू आहेत… बातमीदाराने दलालाशी संपर्क केला. दलाल अजय खाते खरेदी करण्यास तयार झाला. म्हणाला, प्रत्येक खात्यासाठी ५-५ हजार रुपये देईल. मी जी जागा सांगेल त्या जागेवर पासबुक ठेवून द्यायचे. मी उचलून घेईल. २ दिवसांनंतर तुम्हाला पैसे मिळून जातील.