काँग्रेसची विदर्भ, तर भाजपची उत्तर महाराष्ट्रावर भिस्त:2019 च्या विधानसभा निवडणूक निकालाद्वारे जाणून घ्या महाराष्ट्राचा यंदाचा मूड
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणांगण आता अंतिम लढाईसाठी सज्ज झाले आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. पण यावेळी बंडखोर व अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. यात अनेक हेवीवेट नेत्यांचा समावेश आहे. त्यांचे आपापल्या मतदारसंघांत वजनही आहे. सारासार विचार करता यंदाची निवडणूक कदापि एकतर्फी होणार नाही. उलट विजयासाठी प्रत्येकाला कडवी झुंज द्यावी लागेल अशी स्थिती आहे. त्यानंतर विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला विदर्भातून, सत्ताधारी भाजपला उत्तर महाराष्ट्रातून आपल्याला चांगली साथ मिळेल असा विश्वास आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हे याचे प्रमुख कारण आहे… महाराष्ट्राचा मूड काय म्हणतो? 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर खरे चित्र समोर येईल, पण तोपर्यंत महाराष्ट्राचा मूड काय आहे? हे आपण यापूर्वीच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करून पाहूया. विदर्भात काँग्रेसला तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगला पाठिंबा मिळाल्याचे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले होते. उत्तर महाराष्ट्र – 35 जागा
भाजप 20
काँग्रेस 5
शिवसेना (ठाकरे गट) 4
राष्ट्रवादी (शरद पवार गट) 4
शिवसेना (शिंदे गट) २
राष्ट्रवादी (अजित पवार गट) 00 उत्तर महाराष्ट्राचे राजकीय गणित काय सांगते? उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 35 जागा आहेत. त्यापैकी एकट्या भाजपच्या खात्यात 20 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. पण नंतरच्या काळात या दोन्ही पक्षांत फूट पडली. पण त्यानंतरही एकनाथ शिंदे व अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या संख्येवरून या भागातील त्यांच्या पक्षांच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. हो, तर सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या खिशात 35 पैकी सर्वाधिक 20 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 5, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे प्रत्येकी 4, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे 2 आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात येथील एकही जागा नाही. विदर्भ -62 जागा काँग्रेस – 29
भाजप – 15
शिवसेना (ठाकरे गट) – 8
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 5
शिवसेना (शिंदे गट) – 4
इतर – 1
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 00 विदर्भात विधानसभेच्या 68 जागा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 68 जागा एकट्या विदर्भात आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने या 68 पैकी 29 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपचे 15 आमदार निवडून आले होते. त्याचवेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 व 1 अपक्ष आमदार निवडून आला होता. पश्चिम महाराष्ट्रात – 70 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 19
भाजप – 17
शिवसेना (शिंदे गट) – 11
काँग्रेस – 10
शिवसेना (ठाकरे गट) – 6
इतर – 5
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 2 पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या 70 जागा पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत, पण येथील जनादेश काहीसा विखुरलेला आहे. हा भाग शरद पवार यांच्या प्रभावाखालील क्षेत्र मानले जाते. 2019 मध्ये, येथील अनेक मराठा नेते भाजपमध्ये सामील झाले होते. आजमितीस शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली तरी आजही येथील सर्वाधिक 19 आमदार राष्ट्रवादीचे (शरद पवार) आहेत. याशिवाय या भागात भाजपचे 17, शिवसेनेचे (शिंदे गट) 11, काँग्रेसचे शिवसेनेचे (ठाकरे गट) 6, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 2 आमदार आहेत. येथील 5 जागांवर अपक्ष निवडून आले होते. मराठवाडा – 46 जागा शिवसेना (ठाकरे गट) – 15
काँग्रेस – 14
भाजप – 8
शिवसेना (शिंदे गट) – 4
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 3
इतर – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 00 मराठा आरक्षणाचा मराठवाड्यात किती परिणाम? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अवघा मराठवाडा ढवळून निघाला आहे. जरांगे यांचे या भागावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे येथील निवडणूक निकाल अत्यंत रोचक असणार आहेत. मराठवाड्यातील मराठा समाज भाजपच्या विरोधात एकवटला, तर ओबीसी भाजपसोबत आपली ताकद उभे करतील असा विश्लेषकांचा अंदाज आहे. जरांगे यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे चित्र पूर्णतः बदलले आहे. आतापर्यंत मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी निवडणूक लढवली तर त्याचा फटका महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना बसेल असे मानले जात होते. पण आता या दोन्ही एकाच विशेषतः सत्ताधारी आघाडीला फटका बसेल असा दावा केला जात आहे. मराठवाड्यात अजित पवार गटाची नगण्य ताकद 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 15 उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर 10 जागा काँग्रेसने आपल्या खिशात घातल्या होत्या. विशेषतः शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी 2019 मध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढली होती. पण यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे त्यांची या भागातील ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय शरद पवारांच्या पक्षाचेही येथे 3 आमदार आहेत. तर भाजपकडे 8, शिंदे गटाकडे 4 विधानसभा सदस्य आहेत. अर्थात सत्ताधारी महायुतीकडे या भागात केवळ 12 आमदार आहेत. त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा येथे एकही आमदार नाही.