कुणाल कामराच्या विधानाचे संसदेतही पडसाद:कामरा जोकर, त्याच्या डोक्याचा एक भाग मोकळा, शिवसेना खासदाराचे संसदेत विधान

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेय यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक कवितेचे बुधवारी संसदेतही पडसाद उमटले. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत कुणाल कामरा जोकर असून, त्याच्या डोक्याचा एक भाग मोकळा असल्याचे विधान केले. यावेळी त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली. कुणाल कामराने शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत सादर केले आहे. त्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. पण त्यानंतरही कामराने आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. कामराच्या डोक्याचा एक भाग मोकळा अर्थसंकल्पावरील चर्चचेवर सहभाग घेताना ते म्हणाले की, कुणाल कामरा याच्या डोक्याचा एक भाग मोकळा आहे. हा जोकर सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी गरळ ओकत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्यंग व टीका होण्यापासून रोखण्यासाठी एखादा नियम तयार करण्याची गरज आहे. या प्रकरणी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा कामावर बोलले पाहिजे. सध्या कॉमेडीच्या नावाखाली काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात एक गांजा भूतही आहे. ते येथून स्क्रिप्ट लिहून देते आणि हा जोकर तिथे महाराष्ट्रात शिंदेंवर बोलतो. त्यामुळे अशा चॅनलवर बंदी घातली पाहिजे. हेटस्पीच थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. काँग्रेसच्या राजवटीत मुघलांसारखा कर धैर्यशील माने यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसाही केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत प्रगतीच्या उंच शिखरावर जात आहे. पण विरोधक त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. काँग्रेसच्या काळात मुघलांसारखा कर लादण्यात आला. त्यांनी सर्वसामान्य माणसांनाही करमुक्ती दिली नाही. उलट जीएसटी आल्यानंतर त्याची गब्बर टॅक्स म्हणून त्याला हिणवले. पण आज याच कर देणाऱ्या लोकांमुळे देश प्रगतीपथावर अग्रेसर झाला आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदींनीही 12 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. विरोधी पक्षांचे नेते हातात संविधान घेऊन आपण देशाला वाचवत असल्याचा दावा करतात. पण त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात देशाचे संविधान बदलण्याची भाषा होते. आम्ही त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले. हे ही वाचा… विधानसभेला मिळेना विरोधी पक्षनेता:भास्कर जाधवांच्या नावाचे पत्र, पण अजून निवड नाही; ठाकरे गटाचे शिफारस पत्र मागे घेण्याचे संकेत मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. पण या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच राहिली. विरोधी पक्षांनी या खुर्चीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली. पण सरकारने अद्याप त्यांच्या नावाला फारशी मान्यता दर्शवली नाही. त्यामुळे विरोधकांना हा महत्त्वाचा मान केव्हा मिळणार? याविषयी संभ्रमावस्था आहे. वाचा सविस्तर