लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचंय:दर महिन्याला मिळणार भाऊबीज, CM शिंदेंचे आश्वासन; विरोधकांवरही साधला निशाणा

लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचंय:दर महिन्याला मिळणार भाऊबीज, CM शिंदेंचे आश्वासन; विरोधकांवरही साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यात प्रचाराचा नारळा फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध सरकारी योजनांची माहिती सांगत विरोधकांवार जोरदार हल्लाबोल केला. कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांचा विजय पक्का असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. आमचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहोत. आम्हाला राज्यातील महिलांना लखपती झालेले बघायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही पहिली प्रचार सभा आहे आणि त्याचा मान आपल्या कुर्ला मतदार संघाला मिळाला आहे. कुडाळकर ओपनिग बॅट्समॅन झाले आहेत, आणि आता बाकी लोकांना क्लीन बोल्ड करत डिपॉझिट जप्त झाले पाहिजे, फटाके फुटत आहेत , काही ठिकाणी लवंगी फटाके आहेत. मात्र आपला ॲटम बॉम्ब फुटेल, असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे. …तर असे दहा गुन्हे मी करेन
एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार निशाण साधला. शिंदे म्हणाले, विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतले असे म्हणतात. या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार आहे. ते मुंबई हायकोर्टात गेले, पण हायकोर्टानं त्यांना लाफा मारला. विरोधक म्हणतात आमचे सरकार आले की, या योजनेची चौकशी करून योजना बंद करणार, तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेले तुम्हाला चालेल का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच योजना सुरू करणे जर गुन्हा असेल तर असे दहा गुन्हे मी करेन, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे, राहुल गांधीवर टीका
राहुल गांधी खटा खट म्हणाले होते. व्होट घेतले, मात्र आता पैसे नाही म्हणतात. हिमाचलमध्ये योजना सुरू करून बंद केली. राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. आम्ही फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. फेसबुक लाईव्ह करणारे लोक नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या सभेची आयटम साँगने सुरुवात
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुर्ल्यातील सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आली. यामुळे सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. शिवेसेनेच्या वतीने आयटम साँगचे आयोजन करण्यात आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित सापडले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment