परतूरच्या तहसीलदारांवर मुरूम माफियांचा हल्ला:रात्री उशिरा गस्तावर असताना घडला प्रकार, हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद

परतूरच्या तहसीलदारांवर मुरूम माफियांचा हल्ला:रात्री उशिरा गस्तावर असताना घडला प्रकार, हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद

जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे या देखील पथकासोबत होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक 07/03/2025 रोजी मी माझे खाजगी वाहन क्र. MH.22.AW.9305 ने अवैध गौनखणीज उतखनन प्रतिबंधामक कार्यवाही करत असताना रात्री 12.50 वाजेच्या सुमारस इंदिरानगर परतुरच्या पुढे आबा रोडच्या डाव्या बाजुला एका जेसीबीने उतखनन करुन एका पाढऱ्या रंगाच्या हायवात भरताना दिसून आले. त्या दिशेने मी गेले असता हायवा व जेसीबी चालकाने जेसीबी घेऊन पळ काढला. मी माझ्या पथकातील व्यंकट दडंवाडसह महसुल अधिकारी गणेश काळे महसूल सेवकाच्या मोबाईलवर फोन करुन बोलवले तेव्हा मी पाठलग केला आसता पारडगाव रोडला जेसीबीचे टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला तेव्हा मी जेसीबी ताब्यात घेतला. परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना संपर्क साधून पोलिस पथक पाठवण्यास सांगितले. जेसीबीचे फोटो काढत असताना तेथे सहा ते सात लोक नामे 1) अखिल बिल्डर 2) इलियास कुरेशी 3) अमजत कुरेशी 4) इरफान युनुस शेख 5) जुनेद व इतर दोन अशा सहा ते सात लोकांनी माझ्या हातातील मोबाईल हिसकावला व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जेसीबी पळवून नेला. तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. हल्ला करताना आरोपी

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment